
'गुड बॅड अग्ली' फेम आणि मल्यालम चित्रपट क्षेत्रातील प्रसिद्ध अभिनेता शाइन टॉम चाको याच्या चाहत्यांसाठी अत्यंत दु:खदायक बातमी आहे. शाइन आपल्या कुटुंबासोबत जात असताना शुक्रवारी तामिळनाडूतील धर्मपुरीजवळ त्याच्या कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात अभिनेता चाको याच्या वडिलांचा मृत्यू झाला आहे. या अपघातानंतर अभिनेता शाइन टॉम आणि त्याच्या भावाला धर्मपुरी सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. हे वृत्त ऐकून चाहत्यांना धक्का बसला आहे.
लॉरीला धडक बसल्याने अपघात...
मनोरमाच्या एका वृत्तानुसार, शाइन टॉम चाको आपल्या संपूर्ण कुटुंबासह प्रवास करीत होता. यावेळी हा अपघात झाला. अभिनेत्यासोबत त्याची आई, भाऊ आणि ड्रायव्हर गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर तातडीने सर्वांना रुग्णालयात घेऊन जाण्यात आलं. मिळालेल्या माहितीनुसार, तामिळनाडुतील धरमपुरीजवळील पलाकोट्टईजवळ सकाळी ७ वाजेदरम्यान हा अपघात झाला. शाइनच्या कारने समोरील लॉरीला धडक दिली. या भीषण अपघातात गाडीमधील पाचही जण जखमी झाले आहेत.
नक्की वाचा - Deepika Padukone : स्पिरीट चित्रपटानंतर कल्की 2 मधूनही दीपिका पादुकोनला डच्चू? कमबॅकमध्ये अडचणी, काय आहे सत्य?

वडिलांचा मृत्यू...
शाइन आणि त्याचं संपूर्ण कुटुंब बंगळुरूला चालले होते. दरम्यान एका लॉरीने त्यांना मागून धडक दिली. यानंतर एकच गोंधळ उडाला. तातडीने शाइन आणि त्याच्या कुटुंबीयांना रुग्णालयात हलविण्यात आलं. त्यादरम्यान शाइनच्या वडिलांचा मृत्यू झाला. शाइन चाको हा नुकताच मल्यालममधील एका अॅक्शन चित्रपटात दिसला होता. यामध्ये त्याने फ्रेंको सल्वाटोरची भूमिका निभावली होती. या चित्रपटात सुपरस्टार ममूटीचीही महत्त्वाची भूमिका होती.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world