Actress Nidhhi Agerwal: साऊथ सुपरस्टार प्रभासच्या आगामी 'द राजा साब' या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे. बुधवारी हैदराबादमध्ये या चित्रपटातील 'सहाना सहाना' या गाण्याचा लाँच सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. मात्र, या आनंदाच्या कार्यक्रमाला अखरेच्या क्षणी गालबोट लागले. कार्यक्रमातून बाहेर पडताना अभिनेत्री निधी अग्रवाल हिला प्रचंड गर्दीने घेरले आणि तिच्याशी धक्काबुक्की केल्याचा प्रकार समोर आला आहे.
मॉलमध्ये उडाला गोंधळ
या गाण्याचा लाँच सोहळा बुधवारी संध्याकाळी हैदराबादमधील प्रसिद्ध लुलु मॉलमध्ये आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला दिग्दर्शक मारुती आणि मुख्य अभिनेत्री निधी अग्रवाल यांनी हजेरी लावली होती. प्रभासचा चित्रपट असल्याने चाहत्यांनी मॉलमध्ये मोठी गर्दी केली होती. कार्यक्रम सुरळीत पार पडला. मात्र गोंधळ तेव्हा सुरू झाला जेव्हा निधी अग्रवाल कार्यक्रमाच्या ठिकाणाहून बाहेर पडून आपल्या कारकडे जात होती.
You see the glamour, but not the struggles.
— Rathnam News (@RathnamNews) December 17, 2025
Today, actress Nidhi Agerwal was mobbed by vultures disguised as fans at #TheRajaSaab song launch event.#NidhiAgerwal #TheRajaSaabpic.twitter.com/peOgtJO3p3
(नक्की वाचा- Navi Mumbai: नवी मुंबई पुन्हा हादरली! खारघर आणि कोपरखैरणेतून पुन्हा दोन मुली बेपत्ता; आकडा 458 वर)
धक्काबुक्की आणि गैरवर्तन
सोशल मीडियावर समोर आलेल्या व्हिडिओंमध्ये असे दिसत आहे की, निधी अग्रवालला तिच्या कारपर्यंत पोहोचणे कठीण झाले होते. सुरक्षा रक्षकांचे कडे असतानाही अनेक उत्साही चाहत्यांनी तिच्या अत्यंत जवळ जाण्याचा प्रयत्न केला. या गडबडीत निधीला धक्काबुक्की झाली आणि तिला अक्षरशः ओढण्यात आले. या धक्कादायक प्रकारामुळे निधी प्रचंड अस्वस्थ आणि घाबरलेली दिसत होती. कशीबशी ती कारमध्ये बसली, पण त्यावेळी तिच्या चेहऱ्यावरील भीती स्पष्टपणे जाणवत होती.
Worst behaviour by PK fans towards Nidhi Agerwal 🤢🤮
— Praneeth Chowdary (@praneethballa) December 17, 2025
pic.twitter.com/lbUVwTC6hl
या घटनेचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर इंटरनेटवर चाहत्यांच्या वागणुकीचा निषेध केला जात आहे. अनेक युजर्सनी सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
(नक्की वाचा- छत्रपती संभाजीनगर हादरलं! जमिनीचा वाद टोकाला; विनवण्या केल्या तरी माजी सरपंचाची कुटुंबीयांसमोरच क्रूर हत्या)
'द राजा साब' 2026 होणार प्रदर्शित
दिग्दर्शक मारुती यांचा 'द राजा साब' हा प्रभासचा पहिला हॉरर चित्रपट आहे. सुपरस्टार प्रभास एका पूर्णपणे वेगळ्या भूमिकेत यात दिसणार आहे. या चित्रपटात संजय दत्त, निधी अग्रवाल, मालविका मोहनन आणि रिद्धी कुमार यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. जानेवारी 2024 मध्ये या चित्रपटाची अधिकृत घोषणा झाली होती. अनेक विलंबांनंतर, हा चित्रपट संक्रांतीच्या मुहूर्तावर 9 जानेवारी 2026 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world