उदयोन्मुख अभिनेत्रीचं सामूहिक लैंगिक शोषण, प्रसिद्ध अभिनेत्यासह 6 जणांवर गुन्हा दाखल

मल्यायळम अभिनेता निविन पॉली ((Rape allegation against Actor Nivin Pauly ) याच्यावर एका उदयोन्मुख अभिनेत्रीने लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे.  या प्रकरणी निविनवर अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

जाहिरात
Read Time: 3 mins
मुंबई:

केरळची जनता ही चित्रपटप्रेमी असून, या जनतेला हेमा समितीचा (Hema Committee Report) अहवाल प्रसिद्ध झाल्याने जबरदस्त धक्का बसला आहे. या अहवालात अनेक महिला कलाकारांचे म्हणणे नमूद करण्यात आले असून कामाच्या बदल्यात बडे कलाकार, दिग्दर्शक, निर्माते आपले लैंगिक शोषण कसे करतात याचा तपशीलच देण्यात आला आहे. या अहवालानंतर #Metoo चळवळ जोरात सुरू झाली असून अनेक महिला कलाकार, अभिनेत्री नव्याने पुढे येऊ लागल्या आहेत. मल्यायळम अभिनेता निविन पॉली ((Rape allegation against Actor Nivin Pauly ) याच्यावर एका उदयोन्मुख अभिनेत्रीने लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे.  या प्रकरणी निविनवर अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

आरोप काय आहे?

एका अभिनेत्रीने निविन विरोधात लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. या महिलेने निवीनविरोधात एर्नाकुलमच्या ओन्नुकल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. निवीनसह इतर 6 जणांविरोधात तिने ही तक्रार दाखल केली आहे. तिने केलेल्या आरोपानुसार, निविन पॉलीने एका चित्रपटात भूमिका देण्याचं आमिष दाखवून तिला दुबईला बोलावलं होतं. ही घटना 2023 मधील आहे. अभिनेत्याच्या सांगण्यावरुन महिला त्याच्या हॉटेलमध्ये गेली होती आणि निविनने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला होता. मल्याळी वृत्तमाध्यमांनी प्रसिद्ध केलेल्या बातम्यांनुसार  तक्रारदार महिला पहिल्यांदा आरोपी श्रेया हिच्या संपर्कात आली होती. श्रेयाने युरोपमध्ये महिलेला केअरगिवरची नोकरी ऑफर केली होती. ही ऑफर महिलेने नाकारली होती. यावेळी श्रेयाने माझ्याकडून पैसे घेतले होते असे तक्रारदार महिलेचे म्हणणे आहे. याच्या काही दिवसांनंतर श्रेयाने मला एका चित्रपटाची ऑफर दिली होती. या दरम्यान मला गुंगीचे पदार्थ देऊन माझी शुद्ध हरपल्यानंतर माझ्यावर सामूहीक बलात्कार करण्यात आला असे या महिलेने तक्रारीत म्हटलंय. महिलेने एकूण सहाजणांविरोधात आरोप केला आहे.

Advertisement

महिलेने केलेल्या तक्रारीनंतर निवीन पॉली, चित्रपट निर्माता एके सुनील, श्रेया बिनू, बशीर आणि कुट्टन यांच्याविरोधात महिलेवर बळजबरी करणे, सामूहीक बलात्कार करणे, बलात्कार होत असताना तो पाहून विकृत आनंद लुटणे, डांबून ठेवणे, महिलेवर वारंवार बलात्कार करणे यासारख्या कलमांअंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. 1 नोव्हेंबर ते 15 डिसेंबरपर्यंत आपल्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केला गेल्याचं तक्रारदार महिलेचे म्हणणे आहे. 

Advertisement

कलम 376 अंतर्गत गुन्हा 

निविन पॉलीविरोधात आयपीसी कलम 376 (बलात्कार)अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ओन्नकुल पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी सदर गुन्ह्याबाबत माहिती देताना म्हटले की पीडित महिलेच्या तक्रारीच्या आधारे त्यांनी एका महिलेसह एकूण 6 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

Advertisement

नक्की वाचा - दीपिकाच्या Delivery Dateचं EX बॉयफ्रेंड रणबीर कपूरशी खास कनेक्शन? तुम्हाला माहिती आहे?

मी तिला ओळखतही नाही!

या आरोपांना उत्तर देण्यासाठी निवीन पॉली याने  एक पत्रकार परिषद बोलावली होती. यामध्ये त्याने म्हटले की ही तक्रारदार महिला कोण आहे? मी तिला ओळखतही नाही. या सगळ्या बातम्या खोट्या असून माझ्यावरील हा डाग पुसून टाकण्यासाठी मी कायदेशीर लढाईसाठी सज्ज आहे. एका मल्याळी वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार ही घटना गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात घडली होती. ओन्नुकल पोलिसांनी निवीनविरोधात तक्रार दाखल करून घेतली असून तपासासाठी विशेष पोलीस दलाची स्थापना केली आहे.