सध्या बॉलिवूडमध्ये अभिनेत्री दीपिका पादुकोणची मोठी चर्चा सुरू आहे. दीपिकाने आपलं प्रेग्नेन्सी फोटो शूट चाहत्यांसोबत शेअर केलं. आपल्या अनोख्या शैलीत दीपिकाने केलेलं बोल्ड फोटोशूट सध्या चर्चेचा विषय ठरलं आहे. आता येत्या काही दिवसात दीपिकाच्या घरी छोटंसं बाळ दाखल होणार आहे. दक्षिण मुंबईतील एका बड्या रुग्णालयात दीपिकाची डिलिव्हरी होणार असल्याची माहिती आहे. (Deepika Padukone Delivery Date)
दीपिकाच्या डिलिव्हरीची तारीखही समोर आली आहे. त्या तारखेचं आणि तिचा एक्स बॉयफ्रेंड रणबीर कपूरशी खास नातं आहे. सध्याची जोडपी ठरवून प्रेग्नेन्सी ठेवतात आणि बाळ कुठल्या दिवशी व्हायला हवं याचंही डॉक्टरांशी बोलून प्लानिंग केलं जातं. जोडप्याला आपलं बाळ एखाद्या खास दिवशी व्हावं असं वाटत असेल तर अशा प्रकारच्या प्लानिंग सर्रास केल्या जातात.
हे ही वाचा - 53 वर्षांपूर्वी या चित्रपटाने दोन खलनायकांना हिरो बनवलं होतं, प्रदर्शनाच्या काही दिवसांतच झाला होता अभिनेत्रीचा मृत्यू
दरम्यान दीपिकाच्या डिलिव्हरीची तारीख 28 सप्टेंबर आहे. आणि याच दिवशी दीपिकाचा एक्स बॉयफ्रेंड रणबीर कपूरचा वाढदिवस आहे. यंदा रणबीर 41 वा वाढदिवस साजरा करणार आहे. या तारखेवरून सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान सोशल मीडियावर या उलट-सुलट चर्चा सुरू असताना दीपिका पादुकोण मात्र आपली प्रेग्नेन्सी एन्जॉय करीत आहे. दीपिका आपल्या कुटुंबासह आऊटिंगवर जातेय, तर कधी हॉटेलमध्ये जेवायला आणि फिरायला जाताना पाहायला मिळते. बाळाच्या जन्मानंतर दीपिका आणि रणवीर आपल्या नव्या घरी शिफ्ट होणार असल्याचीही चर्चा आहे. दरम्यान दीपिकाला मुलगा होणार की मुलगी, त्यांची नावं काय ठेवणार याबाबतही चाहत्यांनी कयास लावणं सुरू केलं आहे.
28 सप्टेंबरला आणखी कुणाचा वाढदिवस?
लता मंगेशकर
रणबीर कपूर
अभिनव बिंद्रा
या व्यतिरिक्त अनेक आंतरराष्ट्रीय अभिनेत्रींचाही या दिवशी वाढदिवस आहे. यामध्ये हिलरी डफ, नाओमी वॅट्स यांचा समावेश आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world