Standup Against Street Harassment: घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान ऐश्वर्या रायचा 'तो' व्हिडीओ चर्चेत

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

अभिनेता अभिषेक बच्चन आणि कॉस्मेटिक कंपनी लॉरियल पॅरिसची ब्रँड ॲम्बेसिडर अभिनेत्री ऐश्वर्या राय हे दाम्पत्य त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे मागील काही दिवसांपासून चर्चेत आहे. त्याचबरोबर ऐश्वर्या राय बॉलिवूडपासून हल्ली दूर असली तरी, अनेकदा ती कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असते. 

(नक्की वाचा: AR रहमानच्या घटस्फोटानंतर Grey Divorce का आहे चर्चेत? त्याचं प्रमाण का वाढतंय?)

काही दिवसांपूर्वी ग्रे डायव्होर्समुळे  (Grey Divorce) ती चर्चेत आली होती.  आता पुन्हा एकदा ऐश्वर्या रायचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ऐश्वर्याने लॉरियल पॅरिस ब्रँडसाठी एक प्रमोशनल व्हिडिओ तयार केला आहे. ज्यामध्ये ती ब्रँडबद्दल किंवा प्रॉडक्टबद्दल नाही तर, महिलांवर होणाऱ्या शोषणाबद्दल बोलताना दिसत आहे.

Advertisement

(नक्की वाचा: टिक टिक वाजते डोक्यात! मलायका अरोराच्या जीवनात आले नवे प्रेम? कोण आहे हा मिस्ट्री मॅन)

व्हिडीओमध्ये अभिनेत्री ऐश्वर्या राय काय म्हणाली?

व्हिडीओमध्ये अभिनेत्री ऐश्वर्या राय एका महत्त्वाच्या विषयावर बोलताना दिसतेय. घर, ऑफिस, रस्ते... जिथं तिथं महिलांवर अन्याय, अत्याचार होताना दिसतोय. त्याविरोधात तिनं आवाज उठवला आहे. ती म्हणते, “रस्त्यावर होणाऱ्या छेडछाडीचा सामना कसा करावा? रस्त्यावर वावरताना नजर झुकवायची? नाही. थेट समोरच्याकडे बघायचं, ताठ मानेने चालायचं.  माझं शरीर, माझा हक्क ... त्यामुळे आपल्या हक्काबाबत अजिबात तडजोड करू नका, स्वतःला कधीच कमी लेखू नका... स्वतःसाठी नेहमी उभे राहा... स्वतःच्या ड्रेसला, लिपस्टिकला दोष देऊ नका, रस्त्यावर होणाऱ्या छेडछाडीसाठी स्वतःला दोषी ठरवू नका". 

ऐश्वर्या रायच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी लाइक आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. ऐश्वर्याने शेअर केलेल्या व्हिडीओचे अनेकांनी समर्थन करत सकारात्मक कमेंट्स केल्या आहेत.