Malaika Arora Viral Video : बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा कोणत्या-न्-कोणत्या गोष्टीमुळे कायम चर्चेत असते. सोशल मीडियावर तिचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ती अतिशय खूश दिसत असून एका व्यक्तीचा हात पकडून चालत आहे. त्यामुळे हा व्यक्ती कोण आहे? मलायका आणि त्याच्यामध्ये कोणते नाते आहे? याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. पण चाहत्यांनी चर्चा करण्यास सुरुवात केली आहे. हा मिस्ट्री मॅन म्हणजे मलायकाच्या आयुष्यात आलेले नवे प्रेम असल्याचे तिच्या चाहत्यांना वाटत आहे. अर्जुन कपूरसोबत झालेल्या ब्रेकअपमधून मलायका सावरल्याचे दिसतंय, असेही नेटकरी म्हणताहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मलायका अरोरासोबत तो कोण?
व्हायरल व्हिडीओमध्ये मलायकाची बहीण अमृता अरोराही दिसत आहे. पण सर्वांचं लक्ष या मिस्ट्री मॅनने वेधून घेतले, ज्याचा हात मलायकाने पकडला होता. बऱ्याच दिवसांनंतर मलायकाच्या चेहऱ्यावर इतका आनंद दिसला, त्यामुळे मुन्नीच्या चेहऱ्यावर हसू आणणारा हा व्यक्ती आहे तरी कोण? या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी चाहते आतुर झाले आहेत.
(नक्की वाचा: Malaika Arora: मलायका अरोरासोबत आता हा नवीन तरुण कोण? VIDEO VIRAL)
मलायका अरोराचे रिलेशनशिप स्टेटसबाबतचे पोस्ट
काही दिवसांपूर्वीच मलायकाने तिच्या रिलेशनशिप स्टेटसबाबत एक पोस्ट देखील शेअर केले होते. मलायकाने पोस्टमध्ये लिहिलं होते की, "आताचे माझे रिलेशनशिप स्टेटस" असे म्हणत तिनं "रिलेशनशिपमध्ये, सिंगल आणि Hehehe" हे तीन पर्याय देखील नमूद केले होते. एकूणच तिने तिच्या आताच्या स्टेटसबाबत कोणतीही माहिती दिली नाही.
(नक्की वाचा: मलायकासोबतच्या नात्यावर अर्जुन कपूरने पहिल्यांदा सोडले मौन, म्हणाला...)
मलायका-अर्जुनचे ब्रेकअप
दुसरीकडे अर्जुन कपूरने 'सिंघम अगेन' सिनेमाच्या प्रमोशनदरम्यान ब्रेकअपबाबत मोकळेपणाने संवाद साधत तो सिंगल असल्याचे जाहीर केले. अरबाज खानसोबत घटस्फोट घेतल्यानंतर मलायका अर्जुन कपूरसोबत 2018 पासून रिलेशनशिपमध्ये होती. जवळपास सहा वर्षांनंतर या दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. ब्रेकअप झाल्यानंतरही दोघांमध्ये मैत्रीचे नाते कायम आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world