
Sunjay kapoor property dispute: करिश्मा कपूरचा घटस्फोट झालेला पती संजय कपूर यांच्या मालमत्तेच्या बाबतीत कोर्टात प्रकरण सुरू झाले आहे. बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूरची मुले समायरा आणि कियान यांनी त्यांची सावत्र आई प्रिया सचदेव कपूर यांच्या विरोधात कोर्टात केस दाखल केली आहे. याचिकेत प्रिया कपूरवर आरोप करण्यात आला आहे की तिने त्यांच्या दिवंगत वडील संजय कपूरच्या मृत्यूपत्रात फेरफार करून त्यांची सर्व संपत्ती बळकावली आहे. यावर कोर्टाने प्रिया कपूरला संजय कपूरच्या मालमत्तेची संपूर्ण माहिती सादर करण्यास सांगितले आहे. पुढील सुनावणी 9 ऑक्टोबर रोजी होणार आहे. मालमत्तेचा वाद संपेपर्यंत कोर्ट मालमत्तेच्या वाटणीवर स्थगिती आणू शकते.
प्रिया कपूर यांच्या वकिलांनी कोर्टात सांगितले की, संजय कपूर यांच्या मृत्यूपत्राच्या वेळी त्या त्यांच्या कायदेशीर पत्नी होत्या. प्रियाच्या वकिलांनी कोर्टात सांगितले, "आता हे प्रेम आणि जवळीकीचे दावे त्यावेळी कुठे होते, जेव्हा करिश्माने सर्वोच्च न्यायालयात घटस्फोटाची दीर्घ कायदेशीर लढाई लढली होती? त्यांच्या दिवंगत पतीने एक ट्रस्टही बनवला होता. खटला दाखल होण्यापूर्वी पाच दिवसांपूर्वी ट्रस्टच्या कागदपत्रांनुसार 1900 कोटी रुपयांची मालमत्ता मुलांच्या नावावर करण्यात आली होती. करिश्मा कपूरने कोर्टाला सांगायला पाहिजे होते की, तिचा घटस्फोट सर्वोच्च न्यायालयात झाला आहे.
शिवाय प्रिया कपूर असं ही म्हणाल्या की संजय कपूर माझे दिवंगत पती आहेत. त्यांच्याबद्दल मला सहानुभूती आहे. मी त्यांची विधवा आहे. मी त्यांच्या शेवटची कायदेशीर पत्नी आहे. मी शेवटपर्यंत त्यांच्या सोबत होती. त्यावेळी तुम्ही कुठे होत्या? तुमच्या पतीने तुम्हाला खूप वर्षांपूर्वी सोडून दिले होते.' अशा शब्दात प्रिया कपूर यांनी करिश्मा कपूर यांना कोर्टात सुनावलं आहे. करिश्माच्या वकिलांनी संजय कपूरच्या मृत्यूनंतर घडलेल्या घटनांकडे कोर्टाचे लक्ष वेधले. त्यांनी कोर्टाला सांगितले की, प्रिया कपूर यांनी आधी त्यांच्या क्लायंटला सांगितले होते की कोणतेही मृत्यूपत्र नाही. काही मालमत्ता एका ट्रस्टकडे आहे. त्यानंतर काही काळानंतर, करिश्मा आणि प्रिया कपूर यांच्यात झालेल्या बैठका आणि चर्चेत असे ठरले होते की, ट्रस्टच्या तरतुदींवर चर्चा करण्यासाठी दिल्लीत एक बैठक आयोजित केली जाईल.
नक्की वाचा : Sunjay Kapur : 30 हजार कोटी संपत्तीच्या वादात संजय कपूरच्या पत्नीचा मोठा निर्णय!
एएनआयच्या रिपोर्टनुसार, करिश्मा कपूर तिच्या मुलांची कायदेशीर पालक म्हणून उच्च न्यायालयात या प्रकरणाची बाजू मांडत आहे. मुलांनी कोर्टाकडे मागणी केली आहे की, त्यांचे वडील संजय कपूर यांच्या 30 हजार कोटी रुपयांच्या मालमत्तेचे योग्य वाटप करावे. मालमत्तेचा संपूर्ण हिशोब व्यवस्थित देण्यात यावा. मुलांचे म्हणणे आहे की त्यांना त्यांच्या वडिलांच्या मालमत्तेची पूर्ण माहिती दिली नाही आणि अनेक गोष्टी जाणूनबुजून लपवल्या गेल्या आहेत. त्यामुळे संपत्तीचा वाद पुढच्या काळात आणखी वाढण्याची दाट शक्यता आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world