
Priya Sachdev And Vikram Chatwal's Divorce: करिश्मा कपूरचा माजी पती संजय कपूर यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या संपत्तीचा वाद चांगलाच तापला आहे. संजय कपूर यांच्या 30 हजार कोटींच्या मालमत्तेवरुन त्यांची पत्नी प्रिया सचदेव आणि संजय-करिश्माची मुले आमने-सामने आहेत. प्रिया आणि संजय यांचे 2017 साली लग्न झाले होते. त्यापूर्वी प्रियाचे लग्न भारतीय-अमेरिकन अभिनेते आणि हॉटेल व्यावसायिक विक्रम चटवाल यांच्याशी झाले होते.
2006 साली झालं होतं पहिलं लग्न
प्रिया सचदेवचं पहिलं लग्न 2006 साली मोठ्या थाटामाटात झाले होते. हा विवाह सोहळा तीन शहरांमध्ये दहा दिवस चालला होता. प्रिया आणि विक्रम यांना सफीरा नावाची १८ वर्षांची मुलगी आहे. जून 2025 मध्ये संजय कपूर यांच्या मृत्यूच्या काही महिन्यांपूर्वी, प्रिया सचदेव यांनी यूट्यूब शो 'किन अँड काइंडनेस' मध्ये विक्रम चटवालसोबतच्या त्यांच्या तुटलेल्या लग्नाबद्दल सांगितले होते. जाणून घेऊया, प्रिया प्रेग्नेंट असतानाही विक्रमसोबतच्या त्यांच्या नात्यात का दुरावा आला, जो त्यांच्या घटस्फोटाचे कारण ठरला.
( नक्की वाचा : Sunjay Kapur : 10 दिवस लग्न, 126 देशातील पाहुणे, 100 कोटी खर्च! कोण होता संजय कपूरच्या पत्नीचा पहिला नवरा? )
प्रियाने सांगितले की तिला वाटत होते की विक्रमसोबत तिचे 'परफेक्ट मॅच' आहे. प्रिया म्हणाली, 'माझ्या माजी पतीने सर्व निकष पूर्ण केले होते. तो व्हार्टनमध्ये गेला आणि मॉर्गन स्टॅनलीमध्ये काम केले. मी UCLA मधून गणित आणि UCLA आणि LSE मधून 'डबल मेजर' केले. आमच्या दोघांच्याही शिक्षणावरून मला वाटले की हे एक 'परफेक्ट मॅच' आहे. तुम्हाला माहीत आहे की तुम्ही तुमचे करिअर कसे बनवता. पण हे नेहमीच यशस्वी होत नाही. मला वाटले माझ्याकडे सर्वकाही योग्य आहे, पण मी चुकीची निवड केली.'
प्रेग्नेंसीदरम्यान लग्नात दुरावा
प्रियाने पुढे सांगितले की, 'मी प्रेग्नेंट असतानाच मला जाणवू लागले की सर्वकाही ठीक नाहीये. प्रेग्नेंसीच्या 15 ते 20 आठवड्यांनंतर मला वाटले की हे लग्न योग्य नाही. तरीही, हे लग्न टिकवण्याचा मी प्रयत्न केला.'
( नक्की वाचा : Sunjay Kapur : 'माझ्यावर ओरडू नका...' 30,000 कोटींसाठी करिश्मा आणि प्रियाच्या वकिलांची कोर्टात जुगलबंदी,Video )
कधी झाला घटस्फोट?
सफीराचा जन्म 2007 मध्ये झाला, आणि प्रिया सचदेव व विक्रम चटवाल 2011 मध्ये वेगळे झाले. घटस्फोटानंतर विक्रमच्या घरच्यांनी प्रियाची माफी मागितली. वेगळे झाल्यावर सफीराच्या कस्टडीसाठी प्रिया सचदेव आणि विक्रम चटवाल यांच्यात झालेल्या कायदेशीर लढाईत प्रियाचा विजय झाला.
वृत्तांनुसार, संजय कपूर यांनी सफीराला दत्तक घेतले होते, ज्यामुळे ती त्यांची 30 हजार कोटी रुपयांच्या मालमत्तेची कायदेशीर वारस बनली. प्रिया सचदेव आणि करिश्मा कपूर यांच्या आधी, संजय कपूर यांचे लग्न फॅशन डिझायनर नंदिता महतानी (1996-2000) यांच्याशी झाले होते. त्यांना कोणतंही मुल नाही.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world