जाहिरात

Sunjay Kapur: करिश्माच्या घटस्फोटाचे सत्य आले बाहेर! 'या' महिलेमुळे तुटला संसार? बहिणीचा धक्कादायक दावा

त्यामुळे या संपत्तीच्या वादाला वेगळे वळण मिळाले आहे.

Sunjay Kapur: करिश्माच्या घटस्फोटाचे सत्य आले बाहेर! 'या' महिलेमुळे तुटला संसार? बहिणीचा धक्कादायक दावा
मुंबई:

प्रसिद्ध उद्योगपती आणि अभिनेत्री करिश्मा कपूरचा पती संजय कपूर यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबात मालमत्तेवरून मोठा वाद सुरू झाला आहे. सुमारे 30,000 कोटी रुपयांच्या संपत्तीवरून हा वाद पेटला आहे. संजय यांची बहीण मंधीरा कपूर स्मिथ यांनी त्यांची सध्याची पत्नी प्रिया सचदेव यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. प्रियामुळेच संजय आणि करिश्मा कपूर यांचे लग्न तुटले, असा दावा त्यांनी एका मुलाखतीत केला आहे. त्यामुळे या संपत्तीच्या वादाला वेगळे वळण मिळाले आहे. 

मंधीरा कपूर स्मिथ यांनी यूट्यूबर विक्की लालवानी यांना दिलेल्या मुलाखतीत हे खळबळजनक आरोप केले आहेत. करिश्मा आणि संजय यांचा संसार सुरू असताना प्रिया सचदेव वारंवार संजय यांना मेसेज पाठवत होती, असा त्यांचा दावा आहे. संजय आणि करिश्मा त्यांचे लग्न वाचवण्याचा प्रयत्न करत होते, तेव्हा प्रिया त्यांना सतत मेसेज करत होती. मला हे सर्व माहीत आहे, असे मंधीरा यांनी स्पष्टपणे सांगितले. हे लग्न तुटण्यामागे आणि त्यांचा घटस्फोट होण्यामागे प्रिया सचदेव असल्याचा दावा ही या निमित्ताने मंधीरा कपूर स्मिथ यांनी केला आहे.  

नक्की वाचा - Sunjay Kapur: संजय कपूर संपत्ती वादात करिश्माच्या मुलांचा हक्क धोक्यात ? खोट्या मृत्यूपत्राच्या दाव्यानं खळबळ

मंधीरा यांनी प्रिया सचदेव यांच्यावर कुटुंब तोडल्याचाही तीव्र आरोप केला आहे. एका महिलेने दुसऱ्याच्या घरात प्रवेश करून, विशेषतः त्या कुटुंबात लहान मुले असताना, त्यांचे कुटुंब कसे तोडले? असा संतप्त सवाल त्यांनी केला आहे. करिश्मा आणि संजय त्यांचे संबंध सुधारण्याचा प्रयत्न करत होते, त्यांचे दुसरे मूल देखील नुकतेच झाले होते. त्यावेळी प्रिया यांनी त्यांच्यापासून दूर राहायला हवे होते, असे मत मंधीरा यांनी व्यक्त केले.

 Property Dispute: कुटुंबात संपत्तीवरून वाद नकोय? संजय कपूर वादातून प्रत्येकाने शिकायला हवेत 'हे' 5 नियम 

पुढे त्यांनी सांगितले की करिश्मा काही काळासाठी मुंबईला निघून गेली होती. ती लग्नापासून खूष नव्हती. आम्हाला हे सर्व माहित होते. आम्ही तिच्याशी बोलत होतो. तिची समजूत काढत होते. पण आम्हाला त्यात यश मिळाले नाही. तर यापूर्वी, प्रिया सचदेव यांनी दुसऱ्या एका मुलाखतीत त्यांची बाजू मांडली होती. करिश्मापासून घटस्फोट झाल्यावर संजय यांच्याशी त्यांची मैत्री झाली.  नंतर त्या दोघांनी लग्न केले होते असं त्यांनी सांगितलं. त्यानंतर आम्ही आनंदी होते असं प्रिया यांना आपल्या मुलाखतीत सांगिलं होतं. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com