जाहिरात

Sunjay Kapur: कोर्टात चकरा मारण्यापेक्षा मध्यस्थी करा! कपूर कुटुंबातील वादात सुप्रीम कोर्टाने का दिला सल्ला?

Sunjay Kapur Property Dispute: बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूरचा माजी पती संजय कपूर याच्या कुटुंबातील मालमत्तेचा वाद आता देशाच्या सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे.

Sunjay Kapur: कोर्टात चकरा मारण्यापेक्षा मध्यस्थी करा! कपूर कुटुंबातील वादात सुप्रीम कोर्टाने का दिला सल्ला?
Sunjay Kapur Property Case: पुढच्या आठवड्यात या प्रकरणावर पुन्हा सुनावणी होणार आहे.
मुंबई:

Sunjay Kapur Property Dispute: बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूरचा माजी पती संजय कपूर याच्या कुटुंबातील मालमत्तेचा वाद आता देशाच्या सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. तब्बल 30,000 कोटी रुपयांच्या अफाट मालमत्तेच्या सुरक्षेसाठी संजय कपूरची आई रानी कपूर यांनी आपल्या सुनेविरुद्ध म्हणजेच प्रिया सचदेव कपूरविरुद्ध कायदेशीर लढा पुकारला आहे. या प्रकरणावर सुनावणी करताना सुप्रीम कोर्टाने एकीकडे नोटीस जारी केली असली, तरी दुसरीकडे 80 वर्षांच्या रानी कपूर यांना एक भावनिक आणि व्यावहारिक सल्लाही दिला आहे. हे प्रकरण दीर्घकाळ चालू शकते, त्यामुळे वय लक्षात घेता हा वाद आपापसात सोडवण्याचा प्रयत्न करावा, असे कोर्टाने म्हटले आहे.

तुमचे वय 80 आहे...

सुप्रीम कोर्टात न्यायमूर्ती जे. बी. पारडीवाला यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने या प्रकरणावर भाष्य करताना मध्यस्थीवर भर दिला. कोर्टाने रानी कपूर यांना विचारले की, तुमचे वय आता 80 वर्षे आहे, मग या वयात तुम्ही हा वाद का लढत आहात? हा खटला बराच काळ चालू शकते, त्यामुळे एकदाचे काय ते मध्यस्थी करून हा प्रश्न कायमचा सोडवा, अन्यथा यात वेळ आणि पैसा दोन्ही वाया जाईल. कोर्टाने स्पष्ट केले की ते या प्रकरणाची मेरिटवर सुनावणी करतीलच, पण कुटुंबाने शांततापूर्ण मार्ग निवडावा अशी कोर्टाची इच्छा आहे.

( नक्की वाचा : Nashik News: 10 ठिकाणी शेतजमीन, 12 प्लॉट... कुंभमेळा रिंगरोडला खरातचा विळखा! वाचा सविस्तर )
 

नेमका वाद काय?

दिवंगत उद्योगपती संजय कपूर यांच्या आई रानी कपूर यांनी आरके फॅमिली ट्रस्टच्या निर्मितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. हा ट्रस्ट फसवणुकीने तयार करण्यात आला असून, त्याद्वारे त्यांना त्यांच्या मालमत्तेपासून आणि सोना ग्रुपमधील नियंत्रणापासून दूर ठेवले जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. 

या वारसा हक्काच्या वादात सुप्रीम कोर्टाने केवळ सून प्रिया सचदेव हिलाच नाही, तर करिश्मा कपूरची मुले समायरा आणि कियान यांच्यासह इतर संबंधित पक्षांनाही नोटीस बजावली आहे. पुढच्या आठवड्यात या प्रकरणावर पुन्हा सुनावणी होणार आहे.

मालमत्ता गोठवण्याची आणि कागदपत्रे देण्याची मागणी

रानी कपूर यांनी कोर्टाकडे मागणी केली आहे की, या वादाचा निकाल लागेपर्यंत सर्व जंगम आणि स्थावर मालमत्ता सुरक्षित ठेवली जावी. सुनेला किंवा तिच्या सहकाऱ्यांना ट्रस्टच्या मालमत्तेत हस्तक्षेप करण्यापासून रोखावे, असा त्यांचा आग्रह आहे. तसेच, ऑक्टोबर 2017 पासूनच्या ट्रस्टच्या निर्णयांची कागदपत्रे आणि आर्थिक तपशील उघड करण्याचे निर्देशही त्यांनी मागितले आहेत. उच्च न्यायालयात दिलासा न मिळाल्यानंतर रानी कपूर यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली असून, आता संपूर्ण देशाचे लक्ष या हाय-प्रोफाईल प्रकरणाकडे लागले आहे.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com