Businessman Sunjay kapur : उद्योगपती संजय कपूर याचं पोलो मॅच खेळत असताना 12 जून रोजी लंडनमध्ये निधन झालं. यानंतर त्याच्या 30 हजार कोटींच्या संपत्तीवरुन वादंग सुरू आहे. त्याच्या संपत्तीचा उत्तराधिकारी कोण असेल यावरुन लढाई सुरू आहे. ज्यामध्ये उद्योगपती संजय कपूर यांच्या ऑटो कंपोनेट निर्माता सोना कॉमस्टराच्या मालकीचाही समावेश आहे. त्याने दोन लग्न केली होती. त्यामुळे दोन्ही लग्नामधून आलेले त्याचे कायदेशीर वारस, दत्तक मुले आणि त्यांची आई बोर्डरुमच्या निर्णयांना सार्वजनिकपणे आव्हान देत आहे. त्यामुळे वारसा कोणाला मिळू शकेल यावरुन मोठी चर्चा सुरू आहे.
संजय कपूरला तीन मुलं आहेत. त्याची पहिली पत्नी अभिनेत्री करिश्मा कपूर यांची दोन मुलं समायरा (20) आणि कियान (14) आहेत. तर त्यांची सद्य पत्नी प्रिया सचदेव कपूर हिच्याकडून एक मुलगा अजारियस (6) आहेत. तर प्रिया सचदेव कपूर हिच्या पहिल्या लग्नातून तिला सफीरा नावाची मुलगी ही आहे. प्रिया हिचं पहिलं लग्न उद्योगपती विक्रम चटवालसोबत झालं होतं.
सफीराबद्दल सांगायचं झालं तर संजय कपूर याच्या संपत्तीत सफीरालाही हिस्सा मिळेल की नाही हे पूर्णपणे संजय कपूर याच्या मृत्यूपत्रावर अवलंबून आहे. मृत्यूपत्र आहे की नाही याबाबतही अद्याप माहिती नाही. सावत्र मुलाला कायदेशीररित्या दत्तक घेतल्याशिवाय वारसा मिळत नाही.
नक्की वाचा - Sunjay Kapur : संजय कपूरच्या 30,000 कोटींच्या संपत्तीमधील करिश्मा आणि मुलांना काय मिळणार?
आतापर्यंत आलेल्या माहितीनुसार, संजय कपूर याने सफीराला दत्तक घेतलं आहे. ज्यामुळे संजय कपूर याच्या संपत्तीत कायदेशीरपणे तिला हक्क आहे. संजय कपूर याने सफीराला कायदेशीरपणे दत्तक घेतलं होतं, त्यामुळे आता तिला तिचे बायोलॉजिकल वडील विक्रम चटवाल यांच्या संपत्तीत हिस्सा मिळू शकणार नाही.मात्र संजय कपूर याने सफीराला दत्तक घेतलं आहे की नाही याची पुष्टी होऊ शकलेली नाही.
प्रिया सचदेव आणि सफिरा या दोघांनीही आपले आडनाव बदलल्याचे वृत्त आल्यानंतर या वादात आणखी भर पडली आहे. प्रिया आता प्रिया संजय कपूर या नावाने ओळखली जाते, तर सफिरा हिने आपल्या नावातून चटवाल हे नाव काढून टाकले आहे आणि अलीकडेच सफिरा कपूर वापरण्यास सुरुवात केली आहे.