जुने दिवस आठवून भावुक झाला सनी देओल, बॉबी तर रडूच लागला! म्हणाला, मुलाच्या लग्नानंतर...

Sunny Deol Bobby Deol सनी हे सांगत असताना बॉबी देओल तर चक्क रडू लागला.

जाहिरात
Read Time: 2 mins
भावाचं बोलणं ऐकताना बॉबी देओल इमोशनल झाला.
मुंबई:

कपिल शर्माचा 'द ग्रेट इंडियन कॉमेडी' शो ची रंगत आता वाढू लागलीय. या कार्यक्रमातील गेल्या आठवड्यात आमिर खाननं पूर्ण टीमसोबत धमाल केली. तर आगामी भागात देओल ब्रदर्स म्हणजेच सनी आणि बॉबी हजेरी लावणार आहेत. नेटफ्लिक्सवर या भागाची एक झलक दाखवण्यात आली. जबरदस्त कॉमेडीची धमाल असलेला हा शो 4 मे रोजी पाहाता येईल. सनी आणि बॉबी देओल यांनी या भागात मनमोकळी चर्चा केलीय. त्याचबरोबर वडिल धर्मेंद्रसोबत असलेल्या केमिस्ट्रीबाबतही सांगितलं आहे. 

खराब काळाबद्दल काय म्हणाला सनी?

सनी देओलनं या चर्चेच्या दरम्यान त्याच्या वाईट काळातील आठवणी देखील सांगितल्या. त्या काळात सर्व जण स्ट्रगल करत होतं. सनीनं त्याला सध्या मिळत असलेल्या यशाचं श्रेय त्याच्या सूनेला दिलं. माझा मुलगा करणच्या लग्नापूर्वी पापा धर्मेंद्र यांचा 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' हा सिनेमा प्रदर्शित झाला. त्यानंतर गदर आला आणि नंतर अ‍ॅनिमल. परमेश्वरानं मला कुठून कुठपर्यंत आणलं असं तेव्हा वाटलं... सनी हे सांगत असताना बॉबी देओल तर चक्क रडू लागला. बॉबीचा हा इमोशनल व्हिडिओ सोशल मीडियावरही अनेकांना आवडला आहे. 

देओल रॉमँटिक आहेत!

बॉबी देओलनं या कार्यक्रमात बोलताना आम्ही देओल खूप रोमँटिक आहोत. आमचं मन भरत नाही, असं सांगितलं. कपिल शर्मानं त्यावर लगेच होय, हे आम्ही पाहिलंय... असं विनोदी ढंगात उत्तर दिलं. कपिलच्या या जोकवर उपस्थित प्रेक्षकांनी जोरदार टाळ्या वाजवल्या. सनी आणि बॉबी या दोघांनीही हा क्षण चांगलाच एन्जॉय केला.
 

Advertisement
Topics mentioned in this article