Taapsee Pannu: लग्नानंतर अभिनेत्रींसोबत इंडस्ट्रीत काय घडतं? तापसी पन्नूने बॉलिवूडचं धक्कादायक वास्तव केलं उघड

Taapsee Pannu News: बॉलिवूडमध्ये लग्नानंतर अभिनेत्रींच्या करिअरवर परिणाम होतो का? तापसी पन्नूने बॉलिवूडमधील जुन्या विचारसरणीवर आणि अभिनेत्रींच्या बदलणाऱ्या प्रतिमेवर एनडीटीव्हीशी बोलताना मोठा खुलासा केला आहे. सविस्तर वाचा.

जाहिरात
Read Time: 2 mins
"Taapsee Pannu News: लग्नानंतर हीरोईन्सना काम का मिळत नाही? तापसी पन्नूने केला खुलासा"
Taapsee Pannu Instagram
वाचा
Summary is AI-generated, newsroom-reviewed
  • बॉलीवुडमध्ये हीरोईन्सच्या करिअरवर विवाहानंतर नकारात्मक परिणाम होतो, ज्यामुळे त्यांना लीड रोल मिळणे कठीण होते
  • तापसी पन्नूने मान्य केले की इंडस्ट्रीमध्ये अजूनही हीरोईन्सच्या खासगी आयुष्यामुळे ऑनस्क्रीन इमेज प्रभावित होते
  • अनेक वेळा हीरोईन्सना विवाहानंतर सपोर्टिंग किंवा साइड रोल्सची संधी जास्त मिळते, मुख्य भूमिका कमी मिळतात
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

Taapsee Pannu News: बॉलिवूडमध्ये अभिनेत्रींबाबत एक जुना दृष्टिकोन बहुतांश वेळेस पाहायला मिळतो. ते म्हणजे एकदा का अभिनेत्रीचे लग्न झाले की ती हीरोईन मटेरियल राहत नाही, असा समज आहे. लग्नापूर्वी त्यांना जितके रोमँटिक भूमिका ऑफर केल्या जातात, तितके लीड रोल्स लग्नानंतर मिळणे कठीण होऊन बसते. काही अपवाद वगळता बहुतांश अभिनेत्रींना लग्नानंतर सहाय्यक किंवा साइड रोल्सच जास्त मिळतात. पण लग्नानंतरही तापसी पन्नू  (Taapsee Pannu News)आपल्या आवडीनुसार सिनेमे आणि भूमिका करत आहे. या विषयावर तिने NDTVशी खास संवाद साधला. लग्नानंतर अभिनेत्रींच्या कामावर खरोखरच परिणाम होतो, असे सांगतानाच आपण आतापर्यंत यातून कशी वाचलोय, हे देखील तिने स्पष्ट केले.

(नक्की वाचा: Monalisa News: फरमानशी लग्न केल्यानंतर मोनालिसाच्या आयुष्यात वादळ, सासरे म्हणाले: घरात पाऊलही ठेवू देणार नाही)

लग्नानंतर अभिनेत्रींसोबत नक्की काय घडतं?

तापसी पन्नू म्हणाली की, "जर एखादी अभिनेत्री इंडस्ट्रीत खूप मोठी स्टार बनली असेल, तर कदाचित तिला फारसा फरक पडणार नाही. पण बहुतांश अभिनेत्रींसाठी लग्नानंतर गोष्टी बदलतात. "इंडस्ट्रीत आजही असा विचार प्रवाह आहे की, एक यशस्वी अभिनेत्री तीच आहे जिच्याकडे प्रेक्षक एक फँटसी (Fantasy) म्हणून पाहू शकतात. तापसीच्या मते, जेव्हा प्रेक्षकांना अभिनेत्रीचे लग्न झाल्याचे समजते, तेव्हा काहींसाठी तिची प्रतिमा बदलून जाते. मुख्य प्रवाहातील सिनेमात (Mainstream Cinema) अजूनही ही धारणा आहे की, अभिनेत्रीच्या वैयक्तिक आयुष्याचा परिणाम तिच्या ऑन-स्क्रीन प्रतिमेवर होतो. आज काही अभिनेत्री लग्नानंतरही मोठे रोल्स करत असल्या तरी, इंडस्ट्रीची एकूण वस्तुस्थिती यापेक्षा वेगळी आहे, असेही तिने म्हटंलय.

Advertisement

तापसीवर का झाला नाही परिणाम?

तापसी पन्नूने स्पष्ट केले की, कदाचित ती या बदलापासून वाचू शकली कारण मी करिअरच्या सुरुवातीपासूनच एक वेगळी वाट निवडली होती. तिने स्वतःला पारंपरिक 'मेनस्ट्रीम हीरोईन'च्या प्रतिमेत अडकवून ठेवले नाही. तिने अशा सिनेमांची निवड केली ज्यामध्ये केवळ ग्लॅमर नसून कथा आणि व्यक्तिरेखा अधिक महत्त्वाच्या होत्या. तापसीच्या मते, वैयक्तिक आयुष्यातील चढ-उतारांचा तिच्या कामावर कधीच परिणाम झाला नाही, कारण तिने सुरुवातीपासूनच स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली होती.

(नक्की वाचा: Deepika Padukone: दीपिकाचा संयम सुटला! मुंबईच्या सद्यस्थितीवर ट्वीट; BMC ला टॅग करत म्हणाली...)

Photo Credit: NDTV Marathi

Topics mentioned in this article