Taniya chatterjee yuzvendra chahal Controversy: क्रिकेटच्या मैदानात सध्या आयपीएलचा सणसंग्राम सुरु आहे. आयपीएलचा रणसंग्राम रंगात आलेला असतानाच भारतीय क्रिकेट संघातील फिरकीपटू युजवेंद्र चहल एका नव्या सोशल मीडिया वादात सापडला आहे. 'गंदी बात' फेम अभिनेत्री तान्या चॅटर्जी हिने चहलने आपल्याला इन्स्टाग्रामवर मेसेज पाठवल्याचा दावा केल्याने मोठी चर्चा सुरू झाली आहे.
MI vs RCB, IPL 2026 : मुंबईवर RCBचा रॉयल विजय! हार्दिक पांड्याच्या 'त्या' चुकीमुळे पराभवाची हॅट्रिक
युझवेंद्र चहल फसला, अभिनेत्रीला मेसेज!
तान्या चॅटर्जी तिच्या पोस्ट्स किंवा बोल्ड मालिकांमुळे सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. ती अनेकदा वादात सापडत असली तरी, यावेळी ती एका वेगळ्याच गोष्टीमुळे चर्चेत आहे. अलीकडेच, तिने भारतीय क्रिकेटपटू युझवेंद्र चहलकडून एक इंस्टाग्राम मेसेज आल्याचा दावा केला आहे. ज्यामध्ये त्याने तिच्या फोटोवर प्रतिक्रिया देत तिला 'क्युट' म्हटले होते. अभिनेत्रीच्या मते, या मेसेजमुळे तिला आश्चर्य वाटले, कारण ती त्या क्रिकेटपटूला वैयक्तिकरित्या ओळखत नव्हती.
पॅपराझींशी संवाद साधताना तिने आपला फोन दाखवत हा दावा सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. "मला अनेकजण क्यूट म्हणतात, पण कुणीतरी खास व्यक्तीलाही मी क्यूट वाटतेय," असे म्हणत तिने चहलचे नाव घेतले. या प्रकारामुळे चॅटमध्ये नेमके काय आहे, यापेक्षा एका सेलिब्रिटी क्रिकेटपटूने अशा प्रकारे मेसेज करणे योग्य आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
नेटकऱ्यांच्या जोरदार प्रतिक्रिया
व्हायरल व्हिडिओनंतर, कमेंट्स सेक्शनमध्ये प्रतिक्रियांचा पूर आला आहे. अनेक युझर्सनी चहलला टॅग करून स्पष्टीकरणाची मागणी केली, तर काहींनी अभिनेत्रीवर प्रसिद्धी मिळवण्याचा स्टंट केल्याचा आरोप केला. कमेंट्स सेक्शनमध्ये, लोक चहलच्या कृतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. एका युझरने लिहिले, "हे काय चाललंय, यार? तानिया चॅटर्जी युझवेंद्र चहलला उघडं पाडत आहे. युजवेंद्र चहलच्या बाजूने अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही, तरीही सोशल मीडियावर त्याला ट्रोल करण्याचे प्रमाण वाढले आहे.