MI vs RCB Match Update : आयपीएल 2026 चा 20 वा सामना मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात वानखेडे स्टेडियमवर रंगला. मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. त्यानंतर मैदानात उतरलेल्या आरसीबीच्या फलंदाजांनी धावांचा पाऊस पाडला. सलामीवीर फंलदाज फिल सॉल्ट आणि विराट कोहलीने दमदार अर्धशतक ठोकले. या धावांच्या जोरावार आरसीबीने 20 षटकांमध्ये 4 बाद 240 धावांचा डोंगर रचला. त्यानंतर या धावांचं टार्गेट गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या मुंबई इंडियन्सचा डाव 222 धावावंर आटोपत आरसीबीने हा सामना 18 धावांनी जिंकला.
विराट कोहली आणि फिल सॉल्टची अर्धशतकी खेळी
आरसीबीकडून सॉल्टने 36 चेंडूत 78 तर कोहलीने 38 चेंडूत 50 धावा कुटल्या. तर कर्णधार रजत पाटीदारनेही 20 चेंडूत 53 धावांची तुफीन खेळी केली. टीम डेव्हिडने 16 चेंडूत नाबाद 34 धावा केल्या. मुंबई इंडियन्ससाठी सलामीला उतरलेल्या रोहित शर्माने 13 चेंडूत 19 धावा केल्या. रोहित रिटायर्ड हर्ट बाद झाला. तर सूर्यकुमार यादवने 22 चेंडूत 33 धावांची खेळी केली.
PHIL SALT IS DANGER ⚡ 🔥 pic.twitter.com/V035wLInyT
— Johns. (@CricCrazyJohns) April 12, 2026
यामध्ये 5 चौकारांचा समावेश आहे. तर तिलक वर्मा फक्त एक धाव करून बाद झाला. कर्णधार हार्दिक पंड्या 22 चेंडूत 40 धावा करून बाद झाला. आरसीबीसाठी जेकब डफी आणि कृणाल पंड्याल प्रत्येकी एक विकेट मिळाली. तर सुयश शर्माने दोन विकेट्स घेतल्या. मुंबई इंडियन्ससाठी हार्दिक पंड्या,ट्रेंट बोल्ट,शार्दूल ठाकूर आणि मिचेल सँटनरने प्रत्येकी एक विकेट घेतली.
हार्दिक पांड्याच्या निर्णयाचा फटका!
या सामन्यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण आरसीबीच्या फलंदाजांनी हा निर्णय पहिल्याच षटकापासून चुकीचा ठरवला. आधी दिल्ली कॅपिटल्स, मग राजस्थान रॉयल्स आणि आता आरसीबीविरुद्ध मुंबईला सलग तिसऱ्या पराभवाचा धक्का बसला आहे. या पराभवामुळे मुंबई आता पॉईंट टेबलमध्ये आठव्या क्रमांकावर आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world