IPL 2026 KKR vs LSG : आयपीएल 2026 मध्ये पंधरावा सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स यांच्यात झाला.
या मॅचमध्ये केकेआरनं पहिल्यांदा बॅटिंग करताना 4 आऊट 181 रन्स केले होते. लखनौनं हे आव्हान शेवटच्या ओव्हरमध्ये 3 विकेट्स राखत पूर्ण केले. लखनौचे प्रमुख बॅटर आऊट झाल्यानंतर मुकुल चौधरीनं जोरदार फटकेबाजी करत 27 बॉलमध्ये नाबाद 54 रन्स केले आणि लखनौला एक अविस्मरणीय विजय मिळवून दिला.
या सामन्यातील थर्ड अंपायरच्या एका निर्णयावर वाद सुरु झाला आहे. त्याचा फटका केकेआरला बसला असं मानलं जात आहे.
काय झाला वाद?
केकेआरचा सलामीवीर फिन एलन याच्या विकेटवरून मैदानावर आणि सोशल मीडियावर चाहत्यांनी संताप व्यक्त केला आहे. तिसऱ्या अंपायरने दिलेल्या एका निर्णयामुळे क्रिकेट वर्तुळात अंपायरिंगच्या दर्जावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून हा झेल नक्की वैध होता का, अशी चर्चा रंगली आहे.
नेमकं काय घडलं?
कोलकाताच्या ईडन गार्डन्स मैदानावर लखनऊचा कर्णधार ऋषभ पंत याने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. केकेआरची सुरुवात खराब झाली आणि दुसऱ्या ओव्हरमध्येच त्यांना मोठा धक्का बसला. प्रिंस यादवने टाकलेल्या 137.6 किलोमीटर प्रति तास वेगाच्या बॉलवर फिन एलनने मोठा शॉट मारण्याचा प्रयत्न केला. बॉल हवेत गेला आणि बाउंड्रीवर उभ्या असलेल्या दिग्वेश राठीने त्याचा कॅच पकडला. मात्र, हा कॅच घेताना राठीचा पाय बाउंड्री कुशनला लागला होता की काय, असा संशय निर्माण झाला.
( नक्की वाचा : Yuvraj Singh: 'फक्त 3 ते 6 महिने बाकी', डॉक्टरांनी युवराजला दिली होती मृत्यूची तारीख, उत्तर वाचून डोळे पाणवतील )
अंपायरच्या निर्णयावर का होतोय वाद?
रिप्लेमध्ये असे दिसून आले की झेल घेताना राठीचा पाय बाउंड्री कुशनच्या अत्यंत जवळ होता. काही कॅमेरा अँगलमधून तर तो कुशनला स्पर्श करत असल्याचेही जाणवत होते. क्रिकेटच्या नियमांनुसार, जर झेल घेताना खेळाडूचा शरीराचा कोणताही भाग बाउंड्रीला स्पर्श करत असेल, तर तो आऊट नसून सिक्स दिला जातो.
धक्कादायक बाब म्हणजे, इतका जवळचा निर्णय असूनही थर्ड अंपायरकडून हा निर्णय सर्व बाजू तपासून देण्यात आला नाही. थर्ड अंपायरनं मैदानातील अंपायरच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले.

Photo Credit: @Vikas662005
कमेंटेटर्स आणि फॅन्सची नाराजी
हा निर्णय पाहून कॉमेंट्री बॉक्समधील दिग्गजांनीही आश्चर्य व्यक्त केले. इतक्या महत्त्वाच्या सामन्यात अशा तांत्रिक बाबींकडे दुर्लक्ष होणे चुकीचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. सोशल मीडियावरही चाहत्यांनी हा व्हिडिओ शेअर करत अंपायरवर टीका केली आहे. अनेक फॅन्सनी याला 'स्पष्टपणे चुकीचा निर्णय' असे म्हटले आहे. एलनला बाद दिल्याने केकेआरच्या रन रेटवरही परिणाम झाला.
LOOK AT THIS 🤯
— Jeet (@JeetN25) April 9, 2026
🚨You can clearly see advertisement board moving but umpire gave it out without checking it.
IT WAS A SIX FOR FINN ALLEN and Umpire Gave out 😳#KKRvsLSG pic.twitter.com/gYvLVlsLoB
फिन एलन पुन्हा फ्लॉप
केकेआरसाठी चिंतेची बाब म्हणजे फिन एलन सलग चौथ्या सामन्यात अपयशी ठरला आहे. या सामन्यात त्याने 8 बॉलमध्ये केवळ 9 रन केले, ज्यात 2 चौकारांचा समावेश होता.
याआधीच्या सामन्यांमध्येही त्याने पंजाब किंग्जविरुद्ध 6, सनरायझर्स हैदराबादविरुद्ध 28 आणि मुंबई इंडियन्सविरुद्ध 37 रन केले होते. एलन लवकर आऊट झाल्यामुळे कोलकाताच्या मधल्या फळीवर पुन्हा एकदा दबाव निर्माण झाला.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world