Sangeeta Bijlani Farmhouse Theft: सलमान खानच्या EX गर्लफ्रेंडच्या घरी चोरी! टीव्ही पळवला, सीसीटीव्ही, फ्रीज फोडला

'फार्महाऊसचा मुख्य गेट आणि खिडकीची ग्रिल तुटलेली होती. एक टीव्ही सेट गायब होता, सीसीटीव्ही कॅमेरे तसेच बेड आणि रेफ्रिजरेटरसह अनेक घरातील वस्तूंची तोडफोड करण्यात आली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Sangeeta Bijlani's farmhouse Theft: पुण्यातील मावळ भागात असलेल्या प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री आणि सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड संगीता बिजलानीच्या फार्म हाऊसमध्ये चोरी झाल्याचं समोर आले आहे.  अभिनेत्री तिच्या फार्म हाऊसवर पोहोचल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. चोरांनी संगीताच्या शेताची तोडफोड केली होती. मुख्य दरवाजा तुटलेला होता आणि आतही तोडफोड झाली होती.

अभिनेत्री संगिता बिजलानीने तात्काळ पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी आता या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे, अभिनेत्री अनेक महिन्यांनंतर तिच्या फार्म हाऊसवर पोहोचली तेव्हा ही घटना उघडकीस आली. पुणे ग्रामीण पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, अभिनेत्री संगीता बिजलानी म्हणाल्या, 'फार्महाऊसचा मुख्य गेट आणि खिडकीची ग्रिल तुटलेली होती. एक टीव्ही सेट गायब होता, सीसीटीव्ही कॅमेरे तसेच बेड आणि रेफ्रिजरेटरसह अनेक घरातील वस्तूंची तोडफोड करण्यात आली आहे.

Saiyaara Box Office: सैयाराने रचला इतिहास, कोणत्याही स्टार किडची सर्वात मोठी ओपनिंग, केले 7 रेकॉर्ड

पुणे ग्रामीण एसपी संदीप सिंग गिल यांना दिलेल्या तक्रारीत संगीताने म्हटले आहे की, 'माझ्या वडिलांच्या प्रकृतीच्या समस्येमुळे मी फार्म हाऊसवर जाऊ शकले नाही. आज मी माझ्या दोन नोकरांसह फार्म हाऊसवर गेले होते.  तिथे पोहोचताच मुख्य गेट तुटलेला पाहून मला धक्का बसला. आम्ही आत गेलो तेव्हा खिडकीची ग्रिल तुटलेली होती, एक टीव्ही सेट गायब होता आणि दुसरा तुटलेला होता.'

फार्म हाऊसमध्ये चोरी तसेच तोडफोड

याशिवाय, चोरांनी वरच्या मजल्यावर बरीच तोडफोड केली आहे. सर्व बेड तुटलेले होते आणि अनेक घरातील वस्तू आणि मौल्यवान वस्तू चोरीला गेल्या आहेत. सीसीटीव्ही फुटेजमध्ये असे दिसून येते की चोरांनी केवळ लूटच केली नाही तर बरीच तोडफोडही केली आहे. सध्या पोलीस फुटेजद्वारे चोरांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत आणि सीसीटीव्ही फुटेजचाही तपास सुरू आहे.

Advertisement

नक्की वाचा - Shahrukh Khan: अभिनेता शाहरुख खान जखमी, उपचारासाठी थेट अमेरिकेला रवाना, असं काय घडलं?