
Shahrukh Khan Injured: बॉलिवूडचा किंग शाहरुख खान जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. 'किंग' या आगामी चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान एका अॅक्शन सीन करताना शाहरुखला दुखापत झाली आहे. ही दुखापत स्नायूंच्या ताणामुळे झाल्याचे सांगितले जात आहे. हा अपघात झाला तेव्हा अभिनेता मुंबईतील गोल्डन टोबॅको स्टुडिओमध्ये शूटिंग करत होता. डॉक्टरांनी त्याला किमान एक महिना विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे.
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान त्याच्या व्यावसायिक आयुष्याबद्दल नेहमीच चर्चेत असतो. त्याचे चाहते त्याच्या चित्रपटांची आतुरतेने वाट पाहतात. सलग दोन हिट चित्रपट दिल्यानंतर किंग खानने आता त्याच्या दुसऱ्या चित्रपटाची तयारी सुरू केली आहे. त्याचा हा चित्रपट एक अॅक्शन ड्रामा चित्रपट आहे ज्यासाठी तो गेल्या वर्षभरापासून तयारी करत होता, परंतु आता या चित्रपटाच्या सेटवरून एक धक्कादायक बातमी आली आहे. शाहरुख खानला सेटवर दुखापत झाल्याचे सांगितले जात आहे. ज्यामुळे अभिनेत्याला रुग्णालयात नेण्यात आले आहे.
नक्की वाचा: सिनेसृष्टीवर शोककळा! प्रसिद्ध अभिनेत्याचे निधन, लेकीने मदत मागितली पण...
काही सुत्रांच्या म्हणण्यानुसार, "घटनेची माहिती गुप्त ठेवण्यात आली आहे, परंतु शाहरुख आणि त्याची टीम उपचारासाठी अमेरिकेला रवाना झाली आहे. फिल्म सिटी, गोल्डन टोबॅको स्टुडिओ आणि यशराज स्टुडिओ जुलै आणि ऑगस्टसाठी बुक करण्यात आले होते, परंतु आता ते वेळापत्रक पुढे ढकलण्यात आले आहे. आता चित्रपटाचे पुढील वेळापत्रक सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये सुरू होण्याची अपेक्षा आहे.
शाहरुख खानची मुलगी सुहाना खान देखील त्याच्या किंग या बहुप्रतिक्षित चित्रपटात दिसणार आहे. त्याचबरोबर अभिषेक बच्चन, राणी मुखर्जी, दीपिका पदुकोण, अर्शद वारसी, जयदीप अहलावत, राघव जुयाल आणि सौरभ शुक्ला यांसारखे कलाकार या चित्रपटात सामील होणार असल्याच्या बातम्या आहेत. निर्मात्यांनी 'किंग'च्या प्रदर्शनाची तारीख अधिकृतपणे जाहीर केलेली नसली तरी, हा चित्रपट 2026 मध्ये चित्रपटगृहात दाखल होऊ शकतो असे मानले जाते.
Ranya Rao: वडील IPS, स्वत: अभिनेत्री... सोन्याच्या तस्करीत अडकलेली रान्या राव कोण आहे?
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world