जाहिरात
Story ProgressBack

बालपणी लैंगिक शोषणाची शिकार झाली, सलमान खानवर गंभीर आरोप केले; 90 च्या दशकातील या अभिनेत्रीला ओळखलेत का ?

सोमी अली पाकिस्तानी अमेरिकी मूल की एक्ट्रेस थीं. जिनके साथ सलमान खान का रिश्ता काफी लंबा चला और शादी करने की भी खबरें आने लगीं. लेकिन अचानक ब्रेकअप हुआ. और, उसके बाद सोमी अली ने सलमान खान पर बहुत से गंभीर आरोप भी लगाए.

Read Time: 2 min
बालपणी लैंगिक शोषणाची शिकार झाली, सलमान खानवर गंभीर आरोप केले; 90 च्या दशकातील या अभिनेत्रीला ओळखलेत का ?
अभिनेत्रीने केले होते सलमानवर गंभीर आरोप
मुंबई:

बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता सलमान खान याच्या प्रेयसींची यादी मोठी आहे. सलमान खान कधी भारतीय अभिनेत्रींच्या प्रेमात पडला होता तर कधी विदेशी तरुणींच्या त्याचे काही प्रेमभंग हे जगाला कळालेही नाही, मात्र काही प्रेमभंग हे वाद निर्माण करणारे ठरले होते. सलमानच्या काही प्रेयसींनी त्याच्यावर गंभीर आरोप केले होते. ज्यामुळे त्याची प्रेमप्रकरणे जगाला कळाली आणि त्याच्यावर या आरोपांमुळे बरीच टीकाही झाली. सलमानवर गंभीर आरोप करणाऱ्या त्याच्या एकेकाळच्या प्रेयसींमध्ये सोमी अली हिचाही नंबर लागतो. ही केले होते. या मैत्रिणींपैकी एक म्हणजे सोमी अली. पाकिस्तानी अमेरिकी वंशाची अभिनेत्री असलेल्या सोमी अलीने बॉलीवूडमध्ये बऱ्यापैकी नाव कमावले होते. तिचे आणि सलमान खान यांचे प्रेमसंबंध होते, हे दोघे लग्न करणार असल्याच्याही त्याकाळी चर्चा होत्या. मात्र अचानक हे दोघे वेगळे झाल्याचे कळाले होते. त्यावेळी याचे कारण कळाले नव्हते मात्र सोमी अलीने नंतर सलमान खानवर गंभीर आरोप केले होते. 

काय होते आरोप?

सोमी अलीने एका मुलाखतीमध्ये म्हटले होते की, की, ती फक्त सलमान खानसाठी भारतात आली होती. जवळपास 8 वर्षे ती आणि सलमान खान हे प्रेमसंबंधात होते. मात्र या नात्यामुळे आपल्या आयुष्यात वाईट आठवणींचे ओरखडे उठले आणि त्यातून झालेल्या जखमा आजही भळभळत्या आहेत असं सोमीचं म्हणणं आहे. सलमान खानने आपल्याला मारहाण केली होती, तो आपल्याला शिव्याही द्यायचा असं सोमी अलीने म्हटलं होतं. सोमी अली हिचा मेकअप कलाकार अजय शेलार हा माझ्या जखमा मेकअपच्या सहाय्याने लपवायचा असं सोमीने म्हटलं आहे. जखमा लपवल्याशिवाय तिला सेटवर जाणं शक्यच होत नव्हतं. सलमानने सोमी अलीच्या डोक्यावर बाटली फोडली होती असाही आरोप करण्यात येत होता. सोमी अलीने याबाबत स्पष्टीकरण देताना म्हटले होते की सलमानने तिच्या डोक्यावर कोल्डड्रींक ओतलं होतं, बाटली फोडली नव्हती. 

बालपणी झाली होती लैंगिक छळाची शिकार

सोमी अलीचे ती लहान असताना लैंगिक शोषण करण्यात आले होते. याबाबतची माहिती तिने सोशल मीडियाद्वारे दिली होती. कराचीत असताना दिलेल्या एका मुलाखतीत सोमी अलीने सांगितले होते की तिचे वडील दिग्दर्शक आणि निर्माता होते. पण तिच्या आई-वडिलांचे संबंध चांगले नव्हते. याचा फायदा घेत तिच्या घरी काम करणाऱ्या स्वयंपाक्याने तिचे वयाच्या पाचव्या वर्षी शोषण केले होते.  नवव्या वर्षी सोमी अली हिचे दरवाजाची राखण करणाऱ्यानेही लैंगिक शोषण केले होते.  

सोमी अली 'आओ प्यार करें', 'आंदोलन' , 'अंत' आणि 'तीसरा कौन' या चित्रपटांमध्ये झळकली होती.  मिथुन चक्रवर्ती यांची प्रमुख भूमिका असलेल्या 'कृष्ण अवतार' चित्रपटातील तिच्या कामाचे कौतुक झाले होते. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
डार्क मोड/लाइट मोड बदलण्यासाठी
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination