
Superstar in Marathi : हिंदी चित्रपटाचे सुपरस्टार राजेश खन्ना यांच्यापासून दाक्षिणात्य दिग्गज अभिनेता मोहनलाल यांचे चित्रपट महिनोनमहिने थिएटरमध्ये असायचे. त्यांचे चाहते 25 ते 50 आठवड्यांपर्यंत थिएटरमध्ये चित्रपट पाहायला जात असे. अनेक आठवडे त्यांचे चित्ररट थिएटरमधून उतरत नव्हते. मात्र एक सुपरस्टार असाही आहे, ज्याचे नऊ चित्रपट 25 आठवड्यांपर्यंत थिएटरमधून उतरविण्यात आले नव्हते. यासाठी त्यांच्या नावाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये दाखल आहे. हा सुपरस्टार दुसरा तिसरा कोणी नसून मराठी चित्रपटाचा बादशहा दादा कोंडके (Dada Kondke) आहे.
8 ऑगस्ट 1932 मध्ये मुंबईतील लालबागमधील एका कोकणी कुटुंबात जन्मलेले दादा कोंडके यांचं खरं नाव कृष्णा कोंडके. दादा कोंडकेंनी आपली कॉमेडी आणि डबल मिनिंग डायलॉग्जनी प्रेक्षकांचं मन जिंकलं. बालपणातील किरकोळ गुंडगिरी आणि नायगावमधील चाळीतील दिवस हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा एक भाग बनले. त्यांच्या कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीमुळे त्यांनी 'अपना बाजार'मध्ये काम करण्यास सुरुवात केली. नंतर, ते सेवा दल बँडमध्ये सामील झाले, जे त्यांचे कलेच्या क्षेत्रात पहिलं पाऊल होतं. (Dada Kondke entered the Guinness Book of World Records)

दादांनी 1969 मध्ये भालजी पेंढारकर यांचा तांबडी माती चित्रपटातून आपलं फिल्मी करिअर सुरू केलं. दोन वर्षांनंतर 1971 मध्ये सोंगाड्या चित्रपटाने त्यांना एका रात्रीतून स्टार केलं. या चित्रपटातील त्यांनी नाम्याची भूमिका साकारली होती. नाम्याची कॉमेडी आणि साधेपणा प्रेक्षकांना भावला. यानंतर पांडू हवालदार, आंधळा मारतो डोळा, राम राम गंगाराम आणि बोट लावीन तिथं गुदगुल्या सारख्या चित्रपटात काम केलं. या चित्रपटातून ते मराठी सिनेमाचा बादशहा म्हणून ओळखू लागले. त्यांचे 9 चित्रपटही 25 आठवडे थिएटरमध्ये हिट राहिले, ज्यासाठी त्यांचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवले गेले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world