'कुछ कुछ होता है'ची अंजली आठवते का? 27 वर्षांनंतरचा ग्लॅमरस फोटो झाला VIRAL,'हॉलिवूड' कनेक्शनमुळे चर्चेत

सना सईद सोशल मीडियावर नियमितपणे सक्रिय असते. तिचे अनेक आकर्षक फोटो ती शेअर करते.

जाहिरात
Read Time: 2 mins

करण जोहर दिग्दर्शित आणि 1998 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘कुछ कुछ होता है' हा चित्रपट कोणी ही विसरणार नाही. या चित्रपटाने त्यावेळी तरुणाईला भूरळ घातली होती. शाहरूख खान, काजोल आणि राणी मुखर्जीची केमिस्ट्री या चित्रपटात जुळून आली होती. यांच्या बरोबर एक लहान मुलीनेही सर्वांचे लक्षा या चित्रपटात आपल्याकडे वळवले होते. तिची छोटी भूमीका आजही कुणी विसरले नाही. ती भूमीका होती छोट्या अंजलीची. तीच अंजली आता 27 वर्षानंतर कशी दिसते हे पाहिलं तर तुम्ही ही म्हणाल क्या बात है. तिचा  ग्लॅमरस लूक असलेला फोटो सध्या जोरदार व्हायरल होत आहे.    

या यशस्वी चित्रपटात अंजलीची भूमीका केलेली बालकलाकार म्हणजे सना सईद (Sana Saeed). ती सध्या पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. चित्रपटात राणी मुखर्जीच्या मुलीची, म्हणजेच ‘छोटी अंजली'ची भूमिका साकारणारी सना सईद आता 36 वर्षांची झाली आहे. तिच्या लेटेस्ट ग्लॅमरस फोटोंमुळे सोशल मीडियावर तिला मोठी पसंती मिळत आहे. चित्रपटातील तिच्या निरागस कामाला प्रेक्षकांनी त्यावेळी विशेष दाद दिली होती. शिवाय तिच्या आताच्या  ग्लॅमरस लूकला ही सर्वांनी पसंत केलं आहे. तिच्या या फोटोवर अनेकांनी कमेंटही केल्या आहेत. 

नक्की वाचा - Suraj Chavan: सुरज चव्हाणचं केळवण, बस्ता अन् दागिने खरेदी, सोबत कोण होतं? पाहा भन्नाट Video

सना सईद सोशल मीडियावर नियमितपणे सक्रिय असते.  तिचे अनेक आकर्षक फोटो ती शेअर करते. तिचा बदललेला आणि ग्लॅमरस लूक पाहून चाहते थक्क झाले आहेत. अनेकांनी कमेंट्समध्ये, '27 वर्षांनंतर पाहून खूप छान वाटले,' अशी भावना व्यक्त केली आहे. काही चाहत्यांनी तर तिची तुलना चित्रपटातील नायिका काजोल आणि राणी मुखर्जी यांच्याशी केली आहे. तिचे फोटो ही तितकेच सुंदर आणि सर्वांना आकर्षित करणारे आहेत. 

नक्की वाचा - Shah Rukh Khan Red Passport: शाहरुख खानला का मिळालाय लाल पासपोर्ट? काय आहे खासियत?

बालकलाकार म्हणून मिळालेल्या यशानंतरही सना सईदला मुख्य अभिनेत्री म्हणून मनोरंजन सृष्टीत हवी तशी लोकप्रियता आणि यश मिळाले नाही. तिला काही निवडक चित्रपट आणि डान्स रिअ‍ॅलिटी शोमध्ये पाहण्यात आले. 2023 मध्ये सना सईदने तिच्या वैयक्तिक आयुष्यात महत्त्वपूर्ण पाऊल टाकले. तिने तिचा प्रियकर, हॉलीवूड साऊंड डिझायनर असलेल्या साबा वॉनर याच्याशी साखरपुडा केला आहे. साबा लॉस एंजेलिसमध्ये राहतो. सना वारंवार साबा वॉनरसोबतचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

Advertisement