बिग बॉस मराठीचा विजेता सुरज चव्हाण याच्या घरी सध्या लगीन घाई सुरू आहे. सुरज चव्हाण म्हटला म्हणजे सर्वात आधी आठवतं ते गुलीगत बुक्कीत टेंगूळ. अनेक वर्ष लग्नाचं स्वप्न बाळगून असलेला सुरज आता बोहल्यावर चढणार आहे. त्यासाठी त्याची सध्या जोरदार तयारी सुरू आहे. त्यात त्याला त्याचे बिग बॉसचे सहकारी ही मदत करत आहेत. खास करून एक सहकारी तर त्याच्या केळवणा पासून ते अगदी बस्ता बांधण्यापर्यंत सर्वच गोष्टीत सहभागी आहे. तिच्या शिवाय तर सुरजचा पत्ता पण हलत नाही असचं म्हणावं लागतं.
सुरजचं आधी केळवण झालं. त्याचा व्हिडीओ ही त्याने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला आहे. त्याच्या या केळवणाच्या व्हिडीओला तीन लाख पेक्षा जास्त लोकांनी पाहीलं आहे. हजारो लोकांनी लाईक केलं आहे. तर तेवढ्याच लोकांनी त्याला शुभेच्छा ही दिल्या आहेत. हे केळवण त्याला त्याची बिग बॉसची सहकारी अंकिता वालावलकर हिनं दिलं होतं. ती ही या व्हिडीओत दिसत आहे. तिने ही त्यांचं अगदी पारंपारीक पद्धतीने केळवण करताना ती दिसत आहे. केळवणाला बसण्या आधी या दोघांनी खूप गोड नाव घेतलं आहे. त्याचं ही कौतूक होत आहे.
केळवण झाल्यानंतर या जोडप्याने दागिने खरेदी केले. दागिने खरेदी करण्यासाठी सुरज चक्क ठाण्याला आला होता. यावेळी ही त्याच्या सोबत अंकीत वालावलकर होती. तिने त्याच्या पसंतीचे दागिने त्याच्या होणाऱ्या बायकोसाठी खरेदी केले. त्याने या दागिने खरेदीचा व्हिडीओ ही शेअर केला आहे. त्यालाही जवळपास सहा लाखा पेक्षा जास्त लोकांनी पाहीला आहे. दागिने खरेदीनंतर सुरजने लग्नाचा बस्ता बांधला आहे. हा बस्ता त्याने पनवेल इथं बांधला. यावेळी ही त्याच्या बरोबर सावली प्रमाणे अंकीता दिसली. याचाही व्हिडीओ सुरजने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world