जाहिरात

Shah Rukh Khan Red Passport: शाहरुख खानला का मिळालाय लाल पासपोर्ट? काय आहे खासियत?

Red Color Passport: लाल रंगाच्या पासपोर्टला डिप्लोमॅटिक पासपोर्ट असेही म्हटले जाते. हा पासपोर्ट ज्या व्यक्तींना मिळतो, त्यांना अनेक विशेष सुविधा आणि सवलती मिळतात.

Shah Rukh Khan Red Passport: शाहरुख खानला का मिळालाय लाल पासपोर्ट?  काय आहे खासियत?
what is Red Color Passport

Red Color Passport: भारतात नागरिकांना निळ्या रंगाचे पासपोर्ट दिले जातात. निळ्या रंगाचा पासपोर्ट हा नोकरी, व्यवसाय किंवा पर्यटनासाठी वापरले जातात. मात्र, अनेकांना माहित नसेल की भारतामध्ये तीन वेगवेगळ्या रंगांचे पासपोर्ट जारी केले जातात. यापैकी लाल रंगाचा पासपोर्ट सर्वात खास आणि पॉवरफुल व्यक्तींना दिला जातो.

शाहरुख खानकडे लाल रंगाचा पासपोर्ट

बॉलिवूडचा 'किंग खान' अर्थात शाहरुख खान हा अशा काही निवडक व्यक्तींपैकी एक आहे, ज्यांच्याकडे हा लाल रंगाचा पासपोर्ट आहे. भारतात पासपोर्टचे प्रामुख्याने तीन रंग आहेत आणि प्रत्येक रंगाचा पासपोर्ट धारकाच्या पद आणि कामाचा उद्देश यातून कळतो.

तीन पासपोर्टमधील फरक काय?

  • निळा पासपोर्ट : हा सर्वात सामान्य पासपोर्ट आहे, जो सर्व सामान्य नागरिकांना दिला जातो. यात व्यक्तीचा प्रवास कशासाठी आहे याचा उल्लेख असतो.
  • पांढरा पासपोर्ट : हा पासपोर्ट सरकारी कामासाठी विदेशात प्रवास करणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांसाठी जारी केला जातो. या पासपोर्टमुळे धारकाला इमिग्रेशन आणि सुरक्षा तपासणीमध्ये सोप्या आणि जलद सुविधा मिळतात.
  • लाल पासपोर्ट : हा पासपोर्ट सर्वात खास आहे आणि तो अत्यंत महत्त्वाच्या व्यक्तींना आणि डिप्लोमॅट्सना दिला जातो.

(नक्की वाचा- Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: 10 वर्ष लहान 'टप्पू'चा 'बबिता'सोबत साखरपुडा?, भव्य गांधीने मौन सोडलं)

लाल पासपोर्टची खासियत

लाल रंगाच्या पासपोर्टला डिप्लोमॅटिक पासपोर्ट असेही म्हटले जाते. हा पासपोर्ट ज्या व्यक्तींना मिळतो, त्यांना अनेक विशेष सुविधा आणि सवलती मिळतात. या पासपोर्ट धारकांना अनेक देशांमध्ये प्रवास करण्यासाठी व्हिसा घेण्याची आवश्यकता नसते किंवा व्हिसा प्रक्रिया खूप सोपी असते.

आंतरराष्ट्रीय विमानतळांवर त्यांना इमिग्रेशन आणि सिक्युरिटी चेकसाठी सामान्य रांगेत उभे राहावे लागत नाही. त्यांना विशेष वागणूक आणि इमिग्रेशन प्रक्रियेत देखील सूट दिली जाते. हा पासपोर्ट मिळवण्यासाठी पंतप्रधान कार्यालयासह अनेक महत्त्वाच्या मंजुरी घ्याव्या लागतात. शाहरुख खानसारख्या व्यक्ती, जे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करतात, त्यांना अनेकदा हे विशेष पासपोर्ट दिले जातात.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com