जाहिरात

Varun Dhawan: 27 कोटींचा तोटा, तरीही वरुण धवननं एकदाही विचारलं नाही, निर्मात्यानं सांगितली मनातील सल

Vashu Bhagnani vs Varun Dhawan:  तका मोठा तोटा होऊनही वरुण धवनने साधी विचारपूस करण्यासाठी किंवा सांत्वन करण्यासाठी गेल्या 2 वर्षात एकदाही फोन केला नाही, अशी खंत भगनानी यांनी व्यक्त केली.

Varun Dhawan: 27 कोटींचा तोटा, तरीही वरुण धवननं एकदाही विचारलं नाही, निर्मात्यानं सांगितली मनातील सल
Varun Dhawan: वरुण धवनवर निर्मात्यानं केली टीका
मुंबई:

Vashu Bhagnani vs Varun Dhawan:  एकीकडे बॉलिवूडमध्ये मोठे चित्रपट आणि ग्लॅमरची चर्चा असते, तर दुसरीकडे पडद्यामागे अनेकदा आर्थिक आणि कायदेशीर वाद उफाळून येतात. सध्या असेच एक मोठे वादळ प्रसिद्ध निर्माता वासू भगनानी आणि अभिनेता वरुण धवन यांच्यात निर्माण झाले आहे. एकेकाळी अत्यंत जवळचे मानले जाणारे हे नाते आता चक्क न्यायालयाच्या पायरीपर्यंत पोहोचले आहे.

27 कोटींचा तोटा आणि वरुणचे मौन

निर्माता वासू भगनानी यांनी अलीकडेच एका व्हर्च्युअल प्रेस कॉन्फरन्समध्ये आपले दुःख व्यक्त केले. त्यांनी सांगितले की, 2020 मध्ये त्यांनी वरुण धवनला घेऊन 'कुली नंबर 1' हा चित्रपट बनवला होता. या चित्रपटामुळे त्यांना तब्बल 27 कोटी रुपयांचा प्रचंड तोटा सोसावा लागला. मात्र, इतका मोठा तोटा होऊनही वरुण धवनने साधी विचारपूस करण्यासाठी किंवा सांत्वन करण्यासाठी गेल्या 2 वर्षात एकदाही फोन केला नाही, अशी खंत भगनानी यांनी व्यक्त केली आहे.

नात्यांमध्ये कडवटपणा

वासू भगनानी यांनी भावूक होत सांगितले की, वरुण त्यांच्या मुलासारखा आहे आणि मुलांकडून चुका होतात. पण ज्या प्रकारे वागणूक मिळत आहे, त्यामुळे आता नात्यात कडवटपणा आला आहे. ते म्हणाले की, वरुणला नाते जपायचे असेल तर ठीक आहे, नसेल तरीही ठीक आहे. मात्र, इतका पैसा गमावूनही जेव्हा समोरची व्यक्ती साधी चौकशीही करत नाही, तेव्हा मन दुखावते. डेव्हिड धवन आणि वरुण धवन यांच्याशी असलेले त्यांचे जुने ऋणानुबंध आता कायदेशीर वादात अडकले आहेत.

( नक्की वाचा : कियान कपूरला पाहिलंत का? आई करिश्मा आणि बहीण समायरासोबत दिसला खास चार्म; वडिलांच्या 'त्या' आठवणी पुन्हा ताज्या )

गाण्याच्या वापरावरून कायदेशीर लढाई

हा वाद केवळ पैशांपुरता मर्यादित नसून तो बौद्धिक संपदेच्या (Intellectual Property) वापराबाबतही आहे. वासू भगनानी यांनी 'बीवी नंबर 1' सारख्या त्यांच्या जुन्या हिट चित्रपटांमधील गाणी किंवा इतर गोष्टी परवानगीशिवाय वापरल्याचा आरोप केला आहे. वरुण धवनचा आगामी चित्रपट 'है जवानी तो इश्क होना है' मध्ये त्यांच्या परवानगीशिवाय गाण्याचा वापर केल्याचा दावा करत त्यांनी कोर्टात धाव घेतली आहे. "माझ्याकडे येऊन विचारले असते तर मी परवानगी दिली असती, पण दुसऱ्या निर्मात्यासोबत माझ्याच चित्रपटातली गाणी पुन्हा कशी शूट केली जाऊ शकतात?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

(नक्की वाचा : Karisma Kapoor :21 वर्षांची झाली करिश्मा कपूरची मुलगी, वडिलांची होती लाडकी लेक, भावाशी खास बॉन्डिंग, Photos )

ट्रेलर लॉन्च रद्द होण्यामागे 'हे' आहे कारण

वरुण धवनच्या आगामी चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च सोहळा अचानक रद्द करण्यात आला. निर्मात्यांनी याचे कारण 'तांत्रिक बिघाड' असल्याचे सांगितले असले, तरी वासू भगनानी यांच्या मते सत्य काही वेगळेच आहे. कोर्टाच्या अवमानाची भीती असल्यामुळेच हा कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचा दावा भगनानी यांनी केला आहे. सध्या हे प्रकरण बिहारमधील कटिहार आणि पाटणा न्यायालयात पोहोचले असून, बॉलिवूडमधील या नात्यात आता मोठी दरी निर्माण झाली आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com