जाहिरात
Story ProgressBack

वरुण धवनच्या सिनेमासाठी साऊथच्या हिरोईनने मोडली किसिंगची ही पॉलिसी? काय आहे चर्चा

बॉलिवूड अभिनेता वरुण धवनच्या 'बेबी जॉन' सिनेमामध्ये साऊथमधील प्रसिद्ध अभिनेत्री किसिंग संदर्भातील पॉलिसी तोडणार असल्याची जोरदार सुरू आहे.

Read Time: 2 mins
वरुण धवनच्या सिनेमासाठी साऊथच्या हिरोईनने मोडली किसिंगची ही पॉलिसी? काय आहे चर्चा

Baby John Movie: बॉलिवूड अभिनेता वरुण धवनच्या (Varun Dhavan) 'बेबी जॉन' सिनेमाची सर्वत्र सध्या चर्चा सुरू आहे. कारण नुकतेच या सिनेमाचे एक दमदार पोस्टर रिलीज करण्यात आलेय. यापूर्वी मोठ्या पडद्यावर वरुण धवनचा कधीही पाहिला नाही, असा जबरदस्त अवतार या पोस्टरमध्ये पाहायला मिळाला. दुसरीकडे या सिनेमासंदर्भात आणखी एक वृत्त समोर येत आहे. ते म्हणजे साऊथ सिनेमांमधील लोकप्रिय अभिनेत्री कीर्ति सुरेशने (Keerthy Suresh) या चित्रपटासाठी तिची 'नो ऑनस्क्रीन किसिंग पॉलिसी' मोडल्याचे म्हटले जात आहे. तसेच बॉलिवूडमधील पहिल्याच सिनेमामध्ये ती काही तरी हटके करण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. 'बेबी जॉन' हा सिनेमा साऊथ सुपरस्टार थलापति विजयच्या 'थेरी' सिनेमाचा रीमेक आहे.  

(नक्की वाचा: IPL मॅचनंतर शाहरुख खान हॉस्पिटलमध्ये दाखल, डॉक्टरांनी दिलं तब्येतीचं अपडेट)

पॉलिसी मोडण्याचे हे आहे कारण?

'पिंक व्हिला' वेबसाइटच्या रिपोर्टनुसार, कीर्ति सुरेश सिनेमामध्ये वरुण धवनसह इंटिमेट लिप लॉक सीन करताना दिसणार आहे. दरम्यान आताच्या सिनेमांमध्ये किसिंग सीन ही फारच सामान्य बाब झाली आहे. पण काही अभिनेत्री असे सीन देण्यास स्पष्ट नकार देतात. साई पल्लवी देखील यापैकीच एक अभिनेत्री आहे. कीर्ति सुरेश देखील 'नो ऑनस्क्रीन किस पॉलिसी' आतापर्यंत फॉलो करत होती. पण यामुळे तिला मोठ्या प्रमाणात रिजेक्शनचा सामना करावा लागला. 

(नक्की वाचा: सरोगसीच्या चर्चांदरम्यान दीपिका पादुकोण-रणवीर सिंहचा हा VIDEO VIRAL)

सिनेमामध्ये हे कलाकारही झळकणार

कॅलिस दिग्दर्शित 'बेबी जॉन' (Baby John Movie) सिनेमामध्ये वरुण धवन आणि कीर्ती सुरेश मुख्य भूमिका साकारणार आहेत. तर जॅकी श्रॉफ, वामिका गब्बी, सान्या मल्होत्रा यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. दुसरीकडे 'रघु तथा' सिनेमामध्येही कीर्ती महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहे. 

(नक्की वाचा: राजकारण व्यवसाय नव्हे तर खूप मोठे कर्तव्य: रेणुका शहाणे)

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Switch To Dark/Light Mode
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination
Previous Article
IPL मॅचनंतर शाहरुख खान हॉस्पिटलमध्ये दाखल, डॉक्टरांनी दिलं तब्येतीचं अपडेट
वरुण धवनच्या सिनेमासाठी साऊथच्या हिरोईनने मोडली किसिंगची ही पॉलिसी? काय आहे चर्चा
Actress Laila Khan family murder case stepfather sentenced to death big decision of court
Next Article
अभिनेत्री लैला खान-कुटुंब हत्याकांडात सावत्र वडिलांना फाशीची शिक्षा, न्यायालयाचा मोठा निर्णय
;