Vijay Deverakonda: साऊथ सुपरस्टार विजय देवरकोंडाची ED कडून चौकशी; काय आहे प्रकरण?

प्रकाश राज यांच्या व्यतिरिक्त, ईडीने या प्रकरणाच्या चौकशीसाठी अभिनेता राणा दग्गुबती, विजय देवरकोंडा आणि लक्ष्मी मांचू यांनाही समन्स बजावले आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Vijay Deverakonda: प्रसिद्ध अभिनेता विजय देवरकोंडा अवैध ऑनलाइन सट्टेबाजी आणि मनी लाँडरिंग प्रकरणी चौकशीसाठी बुधवारी सक्तवसुली संचालनालयासमोर हजर झाला. विजय देवरकोंडा हैदराबाद येथील ईडीच्या क्षेत्रीय कार्यालयात अधिकाऱ्यांसमोर हजर झाला.

यापूर्वी 30 जुलै रोजी याच प्रकरणात अभिनेता प्रकाश राज यांचीही चौकशी करण्यात आली होती. प्रकाश राज यांच्या व्यतिरिक्त, ईडीने या प्रकरणाच्या चौकशीसाठी अभिनेता राणा दग्गुबती, विजय देवरकोंडा आणि लक्ष्मी मांचू यांनाही समन्स बजावले आहे. अधिकारिक सूत्रांनुसार, सर्व अभिनेत्यांनी ऑनलाइन सट्टेबाजी अॅप्सचे प्रमोशन केले होते, ज्यातून कथितरित्या अवैध मार्गाने पैसा जमा करण्यात आला होता.

(नक्की वाचा-  'ज्यांना समजायचं ते समजतील...' हिंदीत विचारणा झाल्याने नाराज; अस्खलित मराठीत भाषण करुन काजोलने जिंकली मनं!)

काय आहे नेमके प्रकरण?

ईडीने पाच राज्यांच्या पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरच्या आधारावर या अभिनेत्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या कलाकारांनी जाहिरातीच्या शुल्कासाठी ऑनलाइन सट्टेबाजी अॅप्सचे समर्थन केले असा संशय आहे. या अॅप्सच्या माध्यमातून अवैध सट्टेबाजी आणि जुगारामुळे कोट्यवधी रुपयांची अवैध कमाई करण्यात आली.

(नक्की वाचा- Sunjay Kapur Death Reason: मधमाशीमुळे नाही तर...संजय कपूरच्या मृत्यू प्रकरणाला वेगळेच वळण)

या प्रकरणी ईडी मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याच्या (PMLA) तरतुदींनुसार विजय देवरकोंडा याचा जबाब नोंदवून घेऊ शकते. काही सेलिब्रिटींनी आपण ज्या अॅप्सचे समर्थन केले, त्यांची कार्यप्रणाली आपल्याला माहीत नव्हती आणि कोणत्याही गैरकृत्याशी आपला संबंध नव्हता असा दावा केला आहे.

Advertisement