जाहिरात

'ज्यांना समजायचं ते समजतील...' हिंदीत विचारणा झाल्याने नाराज; अस्खलित मराठीत भाषण करुन काजोलने जिंकली मनं!

महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांचा हीरक महोत्सवी सोहळा मंगळवारी, 5 ऑगस्ट 2025 रोजी पार पडला. यावेळी सिने क्षेत्रातील मोठ मोठे कलाकार उपस्थित होते.

'ज्यांना समजायचं ते समजतील...' हिंदीत विचारणा झाल्याने नाराज; अस्खलित मराठीत भाषण करुन काजोलने जिंकली मनं!

Kajol's Speech in Marathi : महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांचा हीरक महोत्सवी सोहळा मंगळवारी, 5 ऑगस्ट 2025 रोजी पार पडला. यावेळी सिने क्षेत्रातील मोठ मोठे कलाकार उपस्थित होते. यावेळी अभिनेत्री काजोल हिचा स्वर्गीय राज कपूर विशेष योगदान पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. विशेष म्हणजे यापूर्वी हा पुरस्कार काजोलची तनुजा यांनाही मिळाला होता. विशेष म्हणजे पुरस्कार मिळाल्यानंतर काजोलने अस्खलित मराठीत भाषण केलं. 

मराठीतून भाषणाची सुरुवात...

नमस्कार सगळ्यांना, आज माझ्या वाढदिवस आहे. आणि आज मी इतक्या मोठ्या लोकांसोबत मंचावर उभी आहे. माझं भाषण यापूर्वीच झालंय, अनुपम खेर यांनी माझ्याबद्दल इतकं काही सांगियलं. त्यानंतर मी आता काय बोलू... मला इतकच बोलायचं आहे, की माझ्यासाठी आजचा दिवस खूप मोठा आहे.  आज माझी आई इथं बसली आहे आणि मी तिची साडी नेसली आहे. हा पुरस्कार यापूर्वी माझ्या आईला मिळाला होता. त्यामुळे माझ्या वाढदिवशी इतकं मोठं गिफ्ट दुसरं काहीच असू शकत नाही. 

नक्की वाचा - April May 99: मैत्रीची परिभाषा अन् बालपणीचा अविस्मरणीय अनुभव! ‘एप्रिल मे ९९' चित्रपटाची वेड लावणारी कथा!

ज्यांना समजायचं ते समजतील...

विशेष म्हणजे काजोल माध्यमांशी बोलतानाही मराठीतून बोलतील. यावेळी काजोल म्हणाली, या पुरस्कार मिळाल्यामुळे मला खूप चांगलं वाटतंय. आज माझ्या वाढदिवशी मला हा पुरस्कार मिळत आहे. माझ्यासाठी हा मोठा दिवस आहे. आज माझी आईही माझ्यासोबत आहे, याचा मला खूप आनंद आहे. तिलाही यापूर्वी हा पुरस्कार मिळाला होता.. काजोलने आपली प्रतिक्रिया दिल्यानंतर तिला हिंदीतून बोलण्याची विचारणा करण्यात आली. मात्र यावर तिने नाराजी व्यक्त केली. आता पुन्हा हिंदीतून बोलू? ज्यांना समजायचं ते समजतील, असं म्हणत तिने हिंदीतून बोलण्यास टाळाटाळ केली. 

साठच्या दशकात महाराष्ट्रातील मराठी चित्रपट, कलाकार आणि तंत्रज्ञांचा भव्यदिव्य सोहळ्यात यथोचित सन्मान करत वाटचाल सुरू करणाऱ्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांचा हीरक महोत्सवी सोहळा मंगळवार, 5 ऑगस्ट 2025 रोजी सायंकाळी 6.30 वाजता वरळी येथील डोम, एसव्हीपी स्टेडियम येथे पार पडला. राज्य चित्रपट पुरस्कारांमध्ये संगीत क्षेत्रातील सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार 2025 या पुरस्काराने गजलनवाज भीमराव पांचाळे यांना सन्मानित करण्यात आलं. तसेच, 2024 चा चित्रपती कै. व्ही. शांताराम जीवन गौरव पुरस्कार प्रसिद्ध दिग्दर्शक, अभिनेते महेश मांजरेकर यांना तर चित्रपती कै. व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार अभिनेत्री मुक्ता बर्वे यांना देऊन सन्मानित करण्यात आलं. याचबरोबर 2024 चा स्व. राज कपूर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांचा सन्मान करण्यात आला. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com