Vin Doghantali Hi Tutena: नुकताच एक कांदे पोह्याचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाची चर्चा सध्या सोशल मीडियावर जोरदार रंगली आहे. त्याला कारण ही तसेच आहे. हा कांदे पोह्याचा कार्यक्रम दुसऱ्या तिसऱ्या कुणाचा नाही तर तेजश्री प्रधानचा होता. या कार्यक्रमाचा धम्माल व्हिडीओ सध्या प्रेक्षकांच्या पसंतीला येत आहे. तेजश्रीच्या घरी हा कार्यक्रम होतो. त्यासाठी तिला पाहण्यासाठी चक्क गौरव मोरे धडकला होता. त्यानंतर या दोघांनी जी काही धम्माल उडवून दिली आहे त्यामुळे सर्वच जण खळखळून हसले आहेत. निमित्त आहे तेजश्री प्रधानच्या नव्या कोऱ्या सिरीअलच्या प्रमोशनचे. झी मराठी या वाहिनीवर तेजश्री प्रधान आणि सुबोध भावे यांची वीण दोघातली ही तुटेना ही मालिका सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर हा प्रमोशन व्हिडीओ करण्यात आला आहे.
वीण दोघातली ही तुटेना या मालिकेत तेजश्री प्रधान स्वानंदीची भूमीका करत आहे. या मालिकेत तिचं लग्न होत नाही असं दाखवलं आहे. स्थळ येतात पण लग्न काही ठरत नाही. या मालिकेचे सध्या जोरदार प्रमोशन सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर विनोदवीर गौरव मोरे हा स्वानंदीला म्हणजेत तेजश्री प्रधानला मागणी टाकण्यासाठी तिच्या घरात धडकतो. तो तिला विचारतो तुम्ही किती शिकलात. त्यावर स्वानंदी म्हणते मी सायन्स पीएचडी केली आहे. त्यावर गौरव म्हणतो म्हणजे तुमची बारावी झाली नाही तर...यावर स्वानंदी थोडी हबकते. त्यावर ती गौरवला तुमचं शिक्षण किती असं विचारते.
त्यावर गौरव उत्तर देण्यात टाळाटाळ कतो. उटल तुमचं घर किती सुटसुटीत आहे. तुमचा सोफा किती कडक आहे असं तिला सांगतो. त्यावर सोफा कडक कसा असेल तो मऊ आहे असं स्वानंदी गौरवला सांगते. त्यावर कडक म्हणजे छान असं आपल्याला म्हणायचं होतं असं तो तिला सांगतो. त्याच्या या वागण्याने स्वानंदी थोडी वैतागलेली असेत. पण तरी ही ती त्याला सहन करते असं या व्हिडीओत दिसते. त्यात ही ती त्याला चहा घेणार का अशी विचारणा करते. त्यावर तिला इंम्प्रेस करण्यासाठी मी चहा नाही कॉफी घेतो असं म्हणत थोडं इंग्रजी बोलण्याचा प्रयत्न करतो. त्यात त्याची धांदल उडते.
स्वानंदी ही त्याला इंग्रजीत बोलते. कॅपिचिनोबद्दल विचारते. पण ते सर्व काही त्याच्या डोक्यावरून जातं. ती पुन्हा त्याला विचारते तुम्ही नक्की काय करता. मग तो सकाळी उठल्या पासून संध्याकाळपर्यंत काय दिनक्रम असतो ते सांगायला सुरूवात करतो. पण त्यात भर म्हणून देवाने दिलेलं आपल्याकडे सर्व काही आहे. पण ती त्याला पुन्हा विचारते तुम्ही काय कमवता. त्यावर तो म्हणतो आहो सर्व काही व्यवस्थित आहे. तुम्हा काळजी करू नका. मग स्वानंदी दिली त्याच्या हॉबी बद्दल विचारते. हॉबी म्हणल्यावर तो म्हणतो बॉबी तुमच्या ओळखीचा कसा यावर स्वानंदी तर कपाळालाच हात लावते. हा प्रसंग अतिशय मजेशीर झाला आहे.
सस्पेन्स संपला! तेजश्री प्रधान- सुबोध भावे झळकणार 'या' नव्याकोऱ्या मालिकेत
हॉबी म्हणजे छंद हे सांगितल्यानंतर तो आपल्या तोंडाचा पट्टा सुरू करतो. ट्रॅव्हलींचा आपला धंद आहे. रोज आपण ऑफीसला जाण्यासाठी ट्रॅव्हलींग करतो हे तिला सांगतो. त्यावर स्वानंदीची अवस्था याला काय बोलू अशी होते. त्यात ही फावल्या वेळात काय करता असं ती विचारते. त्यावर तो म्हणतो मी रम्मी खेळतो. बाबांवर कर्ज होतं. रम्मी खेळून ते झालं होतं. ते कर्ज उतरवण्यासाठी आपणही रम्मी खेळाची असं ठरवलं. रम्मी खेळून कर्ज उतरवले. लोक आपल्याला रम्मी शेट म्हणतात. हे सांगत असताना स्वानंदी त्याच्यावर वैतागते आणि घरातून त्याल चल निघ म्हणत घरातून हाकलून देते. हा कांद्या पोह्यांचा व्हिडीओ तुम्ही पाहिलात तर तुम्हालाही हसू आवरणार नाही.