जाहिरात

सस्पेन्स संपला! तेजश्री प्रधान- सुबोध भावे झळकणार 'या' नव्या कोऱ्या मालिकेत

नियतीने जोडी जुळवली की ठरवून 'लग्न' होतं.आणि न ठरवता 'प्रेम' होतं असं या प्रोमोची टॅगलाईन आहे.

सस्पेन्स संपला! तेजश्री प्रधान- सुबोध भावे झळकणार 'या' नव्या कोऱ्या मालिकेत
मुंबई:

अभिनेत्री तेजश्री प्रधान आणि सुबोध भावे हे पुन्हा एकदा एकत्र येत आहेत. निमित्त आहे झी मराठी या वाहिनी वरील मालिकेचे. झी मराठी वाहीनी एक नवी कोरी मालिका घेवून आली आहे. त्याचा प्रोमो नुकताच प्रदर्शीत करण्यात आला आहे. नियतीने जोडी जुळवली की ठरवून 'लग्न' होतं.आणि न ठरवता 'प्रेम'. असा आशय या प्रोमोमध्ये आहे. त्यामुळे या मालिके बद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

या नव्या मालिकेचे नाव काय असणार याबाबत ही उत्सुकता होती. याबाबत कमालीचा सस्पेन्स राखला गेला होता. मात्र आता या मालिकेचे नाव काय असेल हे समोर आले आहे. 'वीण दोघांतली ही तुटेना' असं या मालिकेचे नाव आहे. लवकरच ती झी मराठीवर प्रदर्शीत होईल. मात्र  ती कधी प्रदर्शीत होणार हे मात्र अजूनही गुलदस्त्यात आहे. त्याची वेळ आणि दिवस लवकरच वाहीनीवर सांगण्यात येणार आहे. त्यामुळे सुबोध भावे आणि तेजश्री प्रधानच्या चाहत्यांना आणखी काही काळ या सिरीअलची वाट पाहावी लागणार आहे. 

ट्रेंडिंग बातमी - Pune Palkhi 2025: माऊलींची पालखी जेजुरीत, भंडारा- खोबऱ्याची उधळण करत भव्य स्वागत

प्रोमोवरून यात ही एका लग्नाची गोष्ट आहे.  सुबोध भावे यांचे लग्न तेजश्री प्रधान हिच्या बरोबर ठरते. पण त्यांच्या कुठेही प्रेम आहे असं प्रथमदर्शनी दिसत नाही. प्रोमोत तेजश्री सांगते आपण हे लग्न भावासाठी करत आहे. तर सुबोध भावे उत्तर देताना हे लग्न आपण बहिणीच्या आग्रहामुळे करत असल्याचं सांगतो. त्यामुळे या नात्यातला ट्वीस्ट आणि त्यानंतर होणाऱ्या घडामोडी या मालिकेत असतील असं बोललं जात आहे.  

ट्रेंडिंग बातमी - Aashadhi Wari: पंढरीची वारी लंडनच्या दारी! 22 देश, 18 हजार किमीचे अंतर, 70 दिवसाचा प्रवास

नियतीने जोडी जुळवली की ठरवून 'लग्न' होतं.आणि न ठरवता 'प्रेम' होतं असं या प्रोमोची टॅगलाईन आहे. त्यामुळे आधी लग्न होणार आणि नंतर या जोडप्यात हळूहळू प्रेम होणार असा मसाला या मालिकेत असेल असा ही अंदाज आहे. बऱ्याच वेळानंतर सुबोध भावे छोट्या पडद्यावर येत आहे. तर तेजश्री प्रधान ही छोट्या पडद्यावर पुन्हा एकदा आपली छाप पाडण्यास सज्ज आहे. आता प्रेक्षकांना ही मालिका कधी पाहाता येणार आहे याची उत्सुकता आहे.   

Listen to the latest songs, only on JioSaavn.com