जाहिरात

Viral photo: हम साथ साथ है मध्ये दिसलेली छोटी मुलगी, 26 वर्षांनंतर आता दिसते इतकी सुंदर की ऐश्वर्या राय ही...

'हम साथ साथ हैं' मधली ती मुलगी आता पूर्णपणे बदलली आहे.

Viral photo: हम साथ साथ है मध्ये दिसलेली छोटी मुलगी, 26 वर्षांनंतर आता दिसते इतकी सुंदर की ऐश्वर्या राय ही...
मुंबई:

'हम साथ साथ हैं' या चित्रपटातील अभिनेत्री नीलमच्या मुलीची भूमिका साकारणारी लहान मुलगी तुम्हाला आठवत असेलच. चित्रपटात सलमान खानच्या भाचीच्या भूमिकेत दिसलेल्या त्या चिमुरडीने तिच्या निरागसतेने चाहत्यांना खूप प्रभावित केले होते. चित्रपट रिलीज होऊन अनेक वर्षे झाली, तरी लोकांना त्या मुलीचा निष्पाप चेहरा आठवतो. पण आज तुम्ही त्या मुलीला पाहिले तर तिला अजिबात ओळखू शकणार नाही. 'हम साथ साथ हैं' मधली ती मुलगी आता पूर्णपणे बदलली आहे. आज ती मॉडेलिंगच्या दुनियेत खूप प्रसिद्ध आहे. 31 वर्षांची झालेली जोया अफरोज आता खूप सुंदर आणि ग्लॅमरस दिसते. तिचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

'हम साथ साथ हैं' मधली ती गोंडस मुलगी म्हणजेच जोया आज मॉडेलिंगच्या दुनियेत वर्चस्व गाजवत आहे. जोया एक सुपर मॉडेल असून तिने मिस इंडिया इंटरनॅशनल 2021 चा खिताब जिंकला आहे. मूळची लखनौची असलेल्या जोयाने तिचे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर मॉडेलिंग सुरू केली. आज ती टॉप मॉडेल्समध्ये समाविष्ट आहे. ती इतकी सुंदर दिसते की लोक म्हणत आहे की ती ऐश्वर्या राय पेक्षा ही सुंदर आहे. तिची एक वेगळी अदा आणि छाप पाहायला मिळत आहे. 

ट्रेंडिंग बातमी - Raj and Uddhav Thackeray: अजबच आहे हे! आता जनता आठवली का ? मनसे नेत्याच्या विधानामुळे खळबळ

जोयाने बालकलाकार म्हणून 'मन', 'कुछ ना कहो' यासारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. यासोबतच जोया टीव्हीवरही अनेक मालिकांमध्ये दिसली होती. 'कोरा कागज', 'जय माता दी', 'हम सात-आठ हैं' आणि 'सोनपरी' या टीव्ही मालिकांमध्ये ती बालकलाकार म्हणून दिसली होती. तर एक तरुण अभिनेत्री म्हणून ती काही काळापूर्वी 'मत्स्य कांड' या वेब सीरिजमध्येही दिसली होती. तर जोयाचे लेटेस्ट फोटो पाहिल्यानंतर लोक तिची तुलना बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टशी करत आहेत.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com