'हम साथ साथ हैं' या एव्हरग्रीन चित्रपटात अभिनेत्री नीलमच्या मुलीची भूमिका साकारलेली ती छोटी मुलगी तुम्हाला आठवतेय का? सलमान खानच्या भाचीच्या भूमिकेत दिसलेल्या या चिमुकलीने आपल्या निरागसतेने प्रेक्षकांची मने जिंकली होती. आज हा चित्रपट प्रदर्शित होऊन 27 वर्षे उलटली आहेत. ती छोटी मुलगी आता 32 वर्षांची एक अतिशय सुंदर आणि ग्लॅमरस तरुणी झाली आहे. तिचे नाव झोया अफरोज असून तिचे ट्रान्सफॉर्मेशन पाहून चाहते थक्क झाले आहेत.
झोया अफरोज आता केवळ एक अभिनेत्री नसून मॉडेलिंगच्या जगात एक मोठे नाव आहे. तिने 'मिस इंडिया इंटरनॅशनल 2021' हे जेतेपद पटकावले आहे. मूळची लखनऊची असलेल्या झोयाने तिचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर मॉडेलिंगमध्ये करिअर सुरू केले. आज ती भारतातील टॉप मॉडेल्सपैकी एक मानली जाते. बालपणी 'सोनपरी' आणि 'कोरा कागज' सारख्या मालिकांमधून घराघरात पोहोचलेली झोया आता वेब सीरिजमध्येही नशीब आजमावत आहे. तिच्या सौंदर्याची तुलना सध्या सोशल मीडियावर आलिया भट्टशी केली जात आहे.
झोयाने केवळ 'हम साथ साथ हैं' मध्येच नाही, तर 'मन' आणि 'कुछ ना कहो' सारख्या चित्रपटांमध्येही बालकलाकार म्हणून काम केले आहे. याशिवाय टीव्ही विश्वातही ती सक्रिय होती. 'कोरा कागज', 'जय माता दी', 'हम सात-आठ हैं' आणि लोकप्रिय मुलांची मालिका 'सोनपरी' मध्येही ती दिसली होती. अलीकडेच तिने 'मत्स्य कांड' या वेब सीरिजमध्ये महत्त्वाची भूमिका साकारली आहे. सोशल मीडियावर तिचे फोटो पाहून ही तीच मुलगी आहे का? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. अनेकांनी तिला 'बॉलिवूडची पुढची सुपरस्टार' असेही म्हटले आहे.
झोयाचे सोशल मीडियावरील लेटेस्ट फोटो पाहून चाहते तिची तुलना बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टशी करत आहेत. तिच्या फोटोंवर नेटकरी कौतुकाचा वर्षाव करत असून, 27 वर्षांनंतर तिला अशा रूपात पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. या पुढच्या काळात ती बॉलिवूडमध्ये आपलं स्वत:चं वेगळं स्थान निर्माण करेल असं तिचे चाहते सांगत आहेत. तिच्या फोटोवर तिच्या चाहत्यांनी अनेक कंमेट केल्या आहेत. शिवाय तिच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा ही दिल्या आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world