क्रिकेटर युजवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्माचा एक व्हिडीओ समोर आला आहे. व्हिडीओमध्ये धनश्री भावनिक दिसत आहे. डोळे देखील पाणावलेले दिसत आहेत. पापाराजींनी तिला विचारलं त्यावेळी तिने म्हटलं की, "खूप इमोशनल फील करत आहे." युजवेंद्र चहल आणि आरजे महवश यांचे फोटो समोर आल्यानंतर धनश्रीच्या या व्हिडीओवर सोशल मीडियामध्ये चर्चा सुरु आहे. मात्र धनश्री इमोशनल का झाली हा प्रश्न अनेकांना पडला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
युजवेंद्र चहल आणि आरजे महवशचे फोटो व्हायरल झाल्यानंतर, धनश्री वर्माने एक इंस्टाग्राम स्टोरी शेअर केली होती. ज्यामध्ये तिने लिहिले की, 'महिलांना दोष देणे नेहमीच एक फॅशन राहिली आहे.' धनश्रीची ही पोस्ट पाहून चाहत्यांना असे वाटते की तिने तिच्या आणि चहलच्या नात्यात निर्माण होणाऱ्या समस्यांबाबत हे विधान केले आहे.
(नक्की वाचा- Dhanashree Varma Post : युजवेंद्र चहल-RJ महवशचे फोटो व्हायरल, धनश्री वर्माची पोस्ट चर्चेत, म्हणाली...)
त्यानंतर तिचा आणकी एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. बुधवारी रात्री धनश्री वर्मा अभिषेक बच्चनच्या 'बी हॅपी' चित्रपटाच्या स्क्रीनिंगला पोहोचली. धनश्री चित्रपट पाहून परत आली तेव्हा तिला विचारण्यात आले की तिला चित्रपट कसा वाटला. यावर उत्तर देताना धनश्री म्हणाली की, मी सध्या खूप इमोशनल फील करत आहे. याशिवाय धनश्रीने चित्रपटाबद्दल काहीही सांगितले नाही.
(नक्की वाचा- घटस्फोटानंतर युजवेंद्र चहल 'या' सौंदर्यवतीच्या प्रेमात? दुबईत दिसले एकत्र; कोण आहे मिस्ट्री गर्ल?)
युजवेंद्रसोबतचे फोटो केले रिस्टोअर
या संपूर्ण वादात आणखी एक गोष्ट समोर आली आहे. धनश्रीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून चहलसोबतचे जुने फोटो रिस्टोअर केल्याचं बोललं जात होतं. तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर नजर टाकल्यास, धनश्रीने युजवेंद्र चहलसोबतची शेवटची पोस्ट गेल्या वर्षी त्याच्या वाढदिवशी शेअर केली होती. त्यानंतर खाली स्क्रोल केले तर त्या दोघांचे आणखी काही फोटो सापडतील.