Samantha Ruth Prabhu Raj Nidimoru: समांथा रूथ प्रभू आणि राज निदिमोरूचे नेटवर्थ किती, कोण आहे जास्त श्रीमंत?

Samantha Ruth Prabhu And Raj Nidimoru Net Worth: समांथा रूथ प्रभूने 'द फॅमिली मॅन' वेबसीरिजचा दिग्दर्शक राज निदिमोरूसोबत लग्न केलं.

जाहिरात
Read Time: 2 mins
"Samantha Ruth Prabhu And Raj Nidimoru Net Worth: समांथा की राज निदिमोरू कोण आहे सर्वात श्रीमंत?"
Samantha Ruth Prabhu Instagram

Samantha Ruth Prabhu And Raj Nidimoru Net Worth: अभिनेत्री समांथा रुथ प्रभूने 'द फॅमिली मॅन' वेबसीरिजचा दिग्दर्शक राज निदिमोरूसोबत लग्न केले. कुटुंबीयांच्या उपस्थितीत या जोडप्याने 1 डिसेंबर 2025 रोजी पारंपरिक पद्धतीने लग्नगाठ बांधली. त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. चाहते समांथाच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत होते आणि आज अखेर त्यांना तिच्या लग्नसोहळ्याची गोड बातमी ऐकायला मिळाली. यानिमित्ताने राज निदिमोरू आणि समांथा रुथ प्रभू यांचे एकूण नेटवर्थ किती आहे, कोण जास्त श्रीमंत आहे, याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया... 

राज निदिमोरू किती श्रीमंत आहे?

रिपोर्ट्सनुसार, राज निदिमोरूची एकूण संपत्ती सुमारे 83-85 कोटी रुपये असण्याचा अंदाज आहे. द फॅमिली मॅन वेबसीरिज आणि गो गोवा गॉन, फर्जी सारखे सुपरहिट सिनेमेही त्याने इंडस्ट्रीला दिले आहेत. राज मुंबईमध्ये एका आलिशान अपार्टमेंटमध्ये राहतो आणि त्याच्याकडे महागड्या गाड्या देखील आहेत. तो बहुतांश उत्पन्न सिनेमा, ओटीटी प्रोजेक्ट आणि ब्रँड एंडोर्समेंटद्वारे कमावतो.  

(नक्की वाचा: Samantha Ruth Prabhu Marriage Photos: समांथा रुथ प्रभूचा फॅमिली मॅन! राज निदिमोरुसोबत या मंदिरात केलं लग्न)

Advertisement

समांथा रुथ प्रभूचे नेटवर्थ | Samantha Ruth Prabhu Net Worth 

समांथा रुथ प्रभूबाबत सांगायचे झाले तर ती वर्ष 2010मध्ये विन्नैथांडी वारुवाया (Vinnaithaandi Varuvaayaa) या तमिळ सिनेमामध्ये तिने महत्त्वाची भूमिका निभावली होती. 2010मध्ये रिलीज झालेल्या रोमँटिक थ्रीलर सिनेमा "ये माया चेसवे से" मध्येही ती झळकली होती, या सिनेमात नागा चैतन्यचीही प्रमुख भूमिका होती. यानंतर समांथा साऊथची सुपरस्टार म्हणून ओळखली जाऊ लागली. ओटीटी आणि बॉलिवूडमध्येही तिने स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केलीय. 15 वर्षे काम केल्यानंतर समांथाचे नेटवर्थ 101 कोटी रुपये असल्याचं म्हटलं जातंय. ब्रँड एंडोर्समेंट आणि सिनेमांद्वारे समांथा उत्पन्न कमावतेय. 

(नक्की वाचा: Samantha Ruth Prabhu : समांथा रुथ प्रभूनं लग्न केलं ते Raj Nidimoru कोण आहेत? 7 वर्षांत मोडला होता पहिला संसार)

Advertisement

इंडिया टाइम्सच्या रिपोर्टनुसार, समांथा एका सिनेमासाठी तीन ते पाच कोटी रुपयांचे मानधन घेते. तर ब्रँड एंडोर्समेंटसाठी वर्षाला 8 कोटी रुपये कमावते. याव्यतिरिक्त मुंबईमध्ये जवळपास 15 कोटी रुपयांची मालमत्ता आणि महागड्या गाड्या देखील आहेत.

Advertisement