जाहिरात

Samantha Ruth Prabhu : समांथा रुथ प्रभूनं लग्न केलं ते Raj Nidimoru कोण आहेत? 7 वर्षांत मोडला होता पहिला संसार

Samantha Marries Raj Nidimoru : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री समंथा रुथ प्रभू सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. सामंथाने तिचा प्रियकर राज निदिमोरु याच्याशी लग्न केले आहे.

Samantha Ruth Prabhu : समांथा रुथ प्रभूनं लग्न केलं ते Raj Nidimoru कोण आहेत? 7 वर्षांत मोडला होता पहिला संसार
Samantha Ruth Prabhu : अभिनेत्री समंथा रुथ प्रभूनं दुसरं लग्न केलं.
मुंबई:

Samantha Marries Raj Nidimoru : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री समंथा रुथ प्रभू सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. सामंथाने तिचा प्रियकर राज निदिमोरु याच्याशी लग्न केले आहे. समंथाचे पहिले लग्न दाक्षिणात्य अभिनेता नागा चैतन्यसोबत झाले होते, पण हे नाते फार काळ टिकले नाही आणि लवकरच त्यांचा घटस्फोट झाला. नागाने पुढे जाऊन शोभिता धुलिपालासोबत संसार थाटला, तर आता समंथानेही तिच्या आयुष्यात नवीन पाऊल टाकले आहे.

कोण आहेत राज निदिमोरु?

राज निदिमोरु हे भारतीय चित्रपट निर्माता, पटकथा लेखक आणि निर्माते आहेत. चित्रपटसृष्टीत ते कृष्णा डीके यांच्यासोबत 'राज अँड डीके' या नावाने प्रसिद्ध आहेत. त्यांच्या अनोख्या आणि वेगळ्या विषयांसाठी हे दोघे ओळखले जातात. त्यांची ‘द फॅमिली मॅन' (The Family Man) ही सिरीज खूप गाजली, ज्याचा सिझन 3 नुकताच प्रदर्शित झाला. 'फॅमिली मॅन' ही देशातील नंबर 1 गुप्तहेर ड्रामा सिरीज म्हणून ओळखली जाते.

राज निदिमोरु यांची पहिली फीचर फिल्म ‘फ्लेव्हर्स' (Flavors) ही 2003 मध्ये इंग्रजी भाषेत बनली. या चित्रपटाला जगभरात उत्तम प्रतिसाद मिळाला आणि परदेशात राहणाऱ्या भारतीय समुदायात हा चित्रपट खूप लोकप्रिय झाला. या चित्रपटाला अनेक पुरस्कार मिळाले आणि जगातील डझनभर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये तो अधिकृतपणे प्रदर्शित झाला होता.

( नक्की वाचा : Saraayah Meaning: कियारा-सिद्धार्थच्या लेकीचं नाव इतकं खास का? 'सरायाह' नावामागे दडलेला 'तो' गुपित अर्थ! )

राज निदिमोरु यांचे शिक्षण आणि कामाची सुरुवात

राज निदिमोरु यांचा जन्म आंध्र प्रदेशातील तिरुपती येथे झाला. त्यांनी एसव्हीयू कॉलेज ऑफ इंजिनियरिंगमधून (SVU College of Engineering) शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी ते अमेरिकेत गेले. राज आणि कृष्णा डीके या दोघांनी त्यांचे टेक करिअर सोडून चित्रपट निर्मितीच्या जगात प्रवेश केला. त्यांची पहिली हिंदी फीचर फिल्म ‘99' ही 2009 साली प्रदर्शित झाली होती.

‘राज आणि डीके' या जोडीने ‘शोर इन द सिटी' (Shor in the City), ‘सिनेमा बंदी' (Cinema Bandi), ‘गो गोवा गॉन' (Go Goa Gone) आणि ‘अनपॉज्ड' (Unpaused) यांसारख्या चित्रपटांसोबतच ‘द फॅमिली मॅन', ‘सिटाडेल: हनी बनी' (Citadel: Honey Bunny), ‘फर्जी' (Farzi) आणि ‘गन्स अँड गुलाब्स' (Guns & Gulaabs) यांसारख्या सिरीजच्या माध्यमातून चित्रपट उद्योगात त्यांची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

राज निदिमोरु यांचा पहिला संसार

राज निदिमोरु यांचे पहिले लग्न 2015 मध्ये श्यामाली डे यांच्यासोबत झाले होते, पण 7 वर्षांनी, म्हणजेच 2022 मध्ये ते वेगळे झाले. श्यामाली यांनी मानसशास्त्रात (Psychology) पदवी घेतली आहे आणि त्यांनी राकेश ओमप्रकाश मेहरा (Rakeysh Omprakash Mehra) आणि विशाल भारद्वाज (Vishal Bhardwaj) यांसारख्या चित्रपट निर्मात्यांसोबत सहाय्यक दिग्दर्शक (Assistant Director) म्हणून काम केले आहे. याव्यतिरिक्त, त्या ‘रंग दे बसंती' (Rang De Basanti) आणि ‘ओमकारा' (Omkara) यांसारख्या चित्रपटांमध्ये पटकथा लेखक आणि सल्लागार (Script Writer and Consultant) म्हणूनही तिचे योगदान होते.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com