Ranveer Singh And Deepika Padukone Networth : दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग बॉलिवूडच्या सर्वात लोकप्रिय कपलपैकी एक आहेत. फिम्ल गोलियों की रासलीला राम-लीला च्या सेटवर या दोघांची ओळख झाली होती. तेव्हापासून दोघांच्या लव्हस्टोरीला सुरुवात झाली अन् काही वर्षानंतर हे क्यूट कपल लग्नबंधनात अडकले. त्यानंतर हे दोघेही सुपरस्टार फक्त फिल्मच नाही,तर त्यांच्या स्टाईल आणि केमिस्ट्रीसाठीही चाहत्यांचे फेव्हरेट बनले. ऑन-स्क्रीन आणि ऑफ स्क्रीन दोन्ही ठिकाणी हे कपल एकमेकांसाटी परफेक्ट आहेत. पण त्यांच्या नेटवर्थबाबत सोशल मीडियावर नेहमीच चर्चा रंगते. रणवीर की दीपिका? कोण आहे सर्वात श्रीमंत? असा प्रश्न अनेकांना पडला असेल, तर जाणून घेऊयात याबाबत सविस्तर माहिती.
नेटवर्थमध्ये कोण आहे सर्वात श्रीमंत?
रिपोर्ट्सनुसार, दीपिका पादुकोणची एकूण संपत्ती जवळपास 500 कोटी रुपये आहे. दीपिका बॉलिवूडमध्ये सर्वात जास्त कमाई करणाऱ्या अभिनैत्रींपैकी एक आहे. तर सर्वात जास्त टॅक्स देणाऱ्या लिस्टमध्येही दीपिकाची नोंद आहे. दीपिका प्रत्येक फिल्मसाठी 15 ते 20 कोटी रुपयांचं मानधन घेते. तसच ती ब्रँड एंडोर्समेंटमधूनही तगडी कमाई करते. ती एका प्रोजेक्टसाठी जवळपास 8 कोटी रुपये मानधन घेते. तर दीपिकाचा पती रणवीर सिंगची एकूण संपत्ती जवळपास 245 कोटी रुपये आहे. रणवीर प्रत्येक फिल्मसाठी 30 ते 50 कोटी रुपयांचं मानधन घेतो.तर अनेक प्रोजेक्ट्स आणि प्रॉफिट-शेअरिंगच्या डीलमध्येही त्याला मोठी कमाई मिळते.
नक्की वाचा >> कुटुंबीयांचा प्रचंड विरोध, तरीही मुस्लीम मुलीनं हिंदू मुलासोबत संसार थाटला, नंतर जे घडलं..थेट Video शेअर केला
लग्झरी संपत्ती आणि गुंतवणूक
दीपिका आणि रणवीर दोघांकडेही मोठी संपत्ती आहे. मुंबईच्या वरळी येथे त्या दोघांचा 40 कोटी रुपयांचा 5BHK अपार्टमेंट आहे. तर वांद्रे येथे त्यांची सी-फेसिंग क्वाडर्पलेक्स 119 कोटी रुपयांचं आहे. जे शाहरुख खानच्या मन्नत बंगल्याजवळ आहे. याशिवाय दोघांनाही अलिबागमध्ये 22 कोटी रुपयांचा सुंदर बंगला आणि बंगळुरुत 6.79 कोटी रुपयांचं सर्व्हिस अपार्टमेंट खरेदी केलं आहे. दीपिकाने स्टार्टअप्समध्येही गुंतवणूक केली आहे.तर रणवीरने कार आणि वॉचचं कलेक्शन केलं आहे. त्याच्या व्हाईट गोल्डची डायमंड वॉच 2.6 कोटी रुपयांची आहे. तर त्याच्याकडे असणाऱ्या लग्झरी कार्स 3 कोटी रुपयांच्या आहेत.
नक्की वाचा >> झुकेगा नही..उंच झाडावर बिबट्याने सिंहाला फोडला घाम, फांदी तुटताच गेम पलटला, Video पाहून लोटपोट हसाल