Kumar Sanu affair :'आम्ही एकमेकांना पती-पत्नी मानलं होतं...', कुमार सानूसोबत अफेअरबाबत अभिनेत्रीचा मोठा खुलासा

When Kunickaa Sadanand accepted her affair with Kumar Sanu: कुनिका सदानंदने सांगितलं की, ते एकमेकांना पती-पत्नी मानत होते.

जाहिरात
Read Time: 2 mins
When Kunickaa accepted her affair with Kumar Sanu: जेव्हा कुनिकाने कुमार सानूसोबत प्रेमसंबंधाचा केला होता स्वीकार
नवी दिल्ली:

Kunickaa Sadanand and Kumar Sanu affair : 1990 च्या दशकातील प्रसिद्ध गायक कुमार सानू  (Kumar Sanu) यांची गाणी आजही सहज आपल्या तोंडात येतात. कुमार सानू हा त्याच्या गाण्याबरोबरच खासगी आयुष्यासाठीही चर्चेत असतो. त्याचं नाव अनेक महिलांसोबत जोडलं गेलं, ज्यात अभिनेत्री कुनिका सदानंद हिचाही समावेश आहे. कुनिका सध्या बिग बॉस 19 (Bigg Boss 19) च्या घरात आहे.

सिद्धार्थ कन्नन याने घेतलेल्या एका मुलाखतीत कुनिकाने कुमार सानूसोबत सहा वर्षांच्या नात्याबाबत मोकळेपणाने संवाद साधला होता. आम्ही एकमेकांना पती-पत्नीप्रमाणे मानतो असंही ती या मुलाखतीत म्हणाली होती. ऊटीमध्ये त्यांची पहिली भेट झाली होती. त्यावेळी कुनिकाचं शूट सुरू होतं. आणि कुमार सानू आपली बहीण आणि भाच्यासह सुट्टींवर आले होते. 

कुनिकाने सांगितलं की, एका रात्री सानू खूप नशेत होता. उदास अवस्थेत तो हॉटेलच्या खिडकीतून उडी मारणार होता. त्यावेळी सानूची बहीण, भाचा आणि कुनिकाने त्याला थांबवलं. यानंतर ते एकमेकांच्या जवळ आले. कुनिका म्हणाली, यानंतर आमच्या भेटी-गाठी वाढल्या. ते माझ्या शेजारी राहायला आले. आम्ही जेवण शेअर करीत असू, वजन कमी करण्यासाठी मी त्यांना मदत केली. 

नक्की वाचा - रेस्टॉरंटमध्ये भांडी घासली, रस्त्यावर कॉस्मेटिक विक्री; आता आहे टीव्हीची Highest Paid अभिनेत्री 

मात्र कुमार सानूंच्या कुटुंबाचा विचार करता कुनिकाने हे नातं कधीच बाहेर येऊ दिलं नाही. ते दोघं केवळ स्टेज शोमध्ये दिसायचे. कुनिका त्यांच्यासाठी कपडे निवडायची आणि परफॉमन्सची तयारी करायची. मात्र जेव्हा कुमार सानूच्या तत्कालिन पत्नी रीटा भट्टाचार्यला याबाबत कळालं तर परिस्थिती बिघडली. एकदा रीटाने माझ्या कारवर हॉकी स्टिकने हल्ला केला होता, माझ्या घराबाहेर येऊन गोंधळ घातला होता. तिला मुलांसाठी पैसे हवे होते, ते चुकीचं नव्हतं. त्यानंतर आम्ही दोघं लांब झालो. मी त्यांना पती मानलं होतं, आणि प्रत्येक परिस्थितीत त्यांना साथ दिली, असंही कुनिकाने या मुलाखतीत सांगितलं होतं. 

Advertisement