Video : तुम्ही ज्यांच्यावर प्रेम करता... ऐश्वर्याच्या नात्याबाबत काय म्हणाला होता सलमान?

सलमान खाननं एका मुलाखतीमध्ये ऐश्वर्या रायबाबतच्या लव्हस्टोरीवर मत व्यक्त केलं होतं.

जाहिरात
Read Time: 2 mins
...जेंव्हा ऐश्वर्याच्या लग्नावर सलमाननं दिली प्रतिक्रिया
मुंबई:

सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांची लव्हस्टोरी कुणापासूनही लपलेली नाही. या दोघांना एकत्र पाहून अनेक फॅन्सच्या काळाजचा ठोका चुकत असे. पण, त्यांचं हे नातं फार काळ टिकलं नाही. हे नातं तुटल्यानंतर सलमान आणि ऐश्वर्या यांनी एकमेकांशी संबंध तोडले. अगदी एकमेकांबद्दल बोलणंही हे दोघं टाळतात. पण,

सलमान खाननं एका मुलाखतीमध्ये आपली एक्स गर्लफ्रेंड ऐश्वर्या रायबद्दल मनातली गोष्ट सांगितली होती. कोणत्या मुलाखतीमध्ये सलमाननं त्याच्या मनातलं गुपीत सांगितलं? सलमान ऐश्वर्याबद्दल काय म्हणाला? त्याला या नात्याबद्दल आज काय वाटतं हे सर्व आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

काय म्हणाला सलमान?

सलमान खाननं रजत शर्मा यांना दिलेल्या मुलाखतीमध्ये ऐश्वर्यासोबतच्या नात्याचा खुलासा केला होता. अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या लग्नावर सलमानला या मुलाखतीमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी बॉलिवूडमध्ये भाईजान म्हणून प्रसिद्ध असलेला सलमान म्हणाला, ' या गोष्टीला आता खूप कालावधी उलटलाय. त्यांना पुन्हा उजाळा देण्यात काही अर्थ आहे असं मला वाटत नाही. जुन्या गोष्टी विसरणंच आता चांगलं आहे. तुम्ही ज्यांच्यावर प्रेम करता ती व्यक्ती तुमच्यापासून वेगळं झाल्यावर दु:खी झाल्यावर तुम्हाला त्रास होतो. ती व्यक्ती आनंदी असेल तुम्ही आनंदी होता.'

Advertisement

सलमाननं या मुलाखतीमध्ये ऐश्वर्या रायचा नवरा आणि अभिनेता अभिषेक बच्चनचीही प्रशंसा केली होती. 'अभिषेक खूप चांगला व्यक्ती आहे. त्याच्याबरोबर ती (ऐश्वर्या राय) खूप खुश आहे. ते दोघं 'मेड फॉर इच आदर' आहेत. तिचं लग्न एका मोठ्या कुटुंबामध्ये झालंय. जुन्या गोष्टींना काही अर्थ आहे, असं मला वाटत नाही,' असं सलमाननं ऐश्वर्याचं नाव न घेता या मुलाखतीमध्ये सांगितलं आहे. 'ब्रेकअप झालं म्हणजे सर्व काही संपलं असं नाही. तुम्ही तुमच्या एक्सला पाहून आनंदी होऊ शकता,' असंही सलमाननं यावेळी सांगितलं.'
 


Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world