Who Is Actress Sara Arjun : दिग्दर्शक आदित्य धर यांच्या धरुंधर सिनेमाने बॉक्सऑफिसवर पहिल्याच आठवड्यात धुमाकूळ घातला आहे. प्रदर्शित झाल्यापासून या सिनेमानं जवळपास 100 कोटींचा गल्ला जमवला आहे. या मल्टीस्टारर सिनेमात सुपरस्टार अभिनेत्यांनी जबरदस्त अॅक्शनचा धमाका केला आहे. फिल्म धुरंधरमध्ये रणवील सिंग, संजय दत्त,अक्षय खन्ना, अर्जुन रामपाल आणि आर माधवनसोबत एक नव्या चेहऱ्यानं इंडस्ट्रीत पाऊल टाकलं आहे. सारा अर्जुन असं या अभिनेत्रीचं नाव आहे. सारा बॉलिवूड सिनेमा धुरंधरच्या माध्यमातून प्रकाशझोतात आलीय,पण तिने यापूर्वी साऊथ इंड्रस्ट्रिही गाजवली आहे.
100 हून अधिक जाहिरातींमध्ये केलंय काम
20 वर्षांच्या सारा अर्जुनच्या वडिलांचं नाव राज अर्जुन आहे. जिने हिंदी, मल्ल्यालम, तेलुगु आणि तामिळ सिनेमांमध्ये काम केलं आहे. आमिर खानचा सिनेमा 'सीक्रेट सुपरस्टार'मध्ये 'फारुख मालिक'च्या भूमिकेतही सारा झळकली होती.दुसरीकडे सारा अर्जुनची आई सान्या अर्जुन एक कथ्थक डान्सर आहे. सान्या साराला तिच्या फिल्मी करिअरमध्ये खूप सपोर्ट करते. साराने फक्त 18 महिन्यांच्या वयातच जाहिरातीत काम केलं होतं. त्यानंतर तिने जवळपास 100 हून अधिक जाहिरातीत अभिनय केला आहे.
नक्की वाचा >> स्मृती मंधानाने इन्स्टाग्रामवर अपडेट केला नवा BIO, काय लिहिलंय? पलाशसोबतचे 'ते' फोटोही केले डिलीट
कसं आहे साराचं फिल्मी करिअर?
सारा अर्जुनने 6 वर्षांची असतानाच तामिळ सिनेमात काम करणं सुरु केलं होतं. तिने तामिळ सुपरस्टार विक्रमसोबत 'देवा थिरुमगल' हा पहिला सिनेमा केला होता.त्यानंतर साराने अनेक सिनेमांमध्ये काम केलं.
नक्की वाचा >> याड लागलं रं..! अंधेरीत स्टार अभिनेत्रीनं मध्यरात्री नको ते केलं, पोलिसांची उडाली झोप, Video व्हायरल
यामध्ये इमरान हाशमीचे एक थी डायन, पीएस-१, टूलसाइड्स ज्यूनियर आणि सांड की आँख सारख्या सिनेमांचा समावेश आहे. साराने आता धुरंधर मधून बॉलिवूडमध्ये चमकली आहे. तिच्यापेक्षा वयाने 20 वर्ष मोठ्या असलेल्या रणवीर सिंगसोबत तिची केमिस्ट्री या सिनेमातून समोर आली आहे.