Smriti Mandhana Instagram Latest Bio : स्मृती मंधाना आणि पलाश मुच्छल यांच्या लग्नाबाबत सोशल मीडियावर रान उठलं होतं. दोघेही 23 नोव्हेंबरला लग्नबंधनात अडकणार होते. पण स्मृतीच्या लग्नाच्या दिवशीच तिचे वडील श्रीनिवास मंधाना यांची तब्येत बिघडली होती. त्यामुळे त्यांचं लग्न पुढे ढकलण्यात आलं होतं. अशातच आता स्मृती आणि पलाशने लग्न रद्द झाल्याची पोस्ट शेअर करत या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. विशेष म्हणजे स्मृतीने तिचा इन्स्टाग्राम बायोसुद्धा नव्याने अपडेट केला आहे. तसच स्मृतीने पलाशसोबतचे सर्व फोटोही इन्स्टाग्रामवरून डिलिट केले आहेत. लग्न पुढे ढकल्यानंतर दोघांनीही त्यांच्या इन्स्टाग्रामवर ब्लू इमोजी अपडेट केला होता. जो निगेटिव्ह एनर्जीपासून रक्षण करतो, असं लोक म्हणतात. पण आज स्मृतीने तो ब्लू रंगाचा इमोजी बायोमधून काढून टाकला आहे. स्मृतीने इन्स्टाग्रामच्या नव्या बायकोमध्ये 'SM18 Famjam' असं लिहिलं आहे.
स्मृती मंधानाने पलाशसोबतचे सर्व फोटो केले डिलीट
स्मृती मंधानाने पलशसोबतचे काही फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले होते. तिने हळदीचे आणि मेहंदीचे फोटो लग्न पुढं ढकल्याच्या दुसऱ्या दिवशीच इन्स्टाग्रामवरून काढून टाकले होते. पण पलाश आणि स्मृतीचे खास फोटो आज सकाळपर्यंत इन्स्टाग्रामवर सेव्ह होते. परंतु, स्मृतीने इन्स्टाग्रावर स्टोरी शेअर करत लग्न रद्द झाल्याची माहिती दिली. त्यानंतर तिने इन्स्टाग्रामचा नवा बायो अपडेट केला आणि पलाशसोबतचे फोटो डिलिट केले.

नक्की वाचा >> स्मृती मंधाना आणि पलाश मुच्छलची सर्वात पहिली भेट कधी अन् कुठे झाली? दोघांमध्ये किती वर्ष होते प्रेमसंबंध?
स्मृती-पलाशने इन्स्टाग्रामवर केला होता 'हा' बदल
लग्नाच्या दिवशी स्मृतीच्या वडिलांची प्रकृती खराब झाल्याची घटना घडली होती. स्मृती-पलाशच्या लग्नाला कोणाची तरी वाईट नजर लागली की काय?असाही ट्रेंड इंटरनेटवर सुरू झाला होता. दरम्यान, स्मृती मंधाना आणि पलाशने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक ब्लू इमोजी ठेवला होता. या इमोजीचा अधिकृत अर्थ काय आहे, याबाबत जरी साशंकता असली, तरी हा निळा इमोजी नजर लागू नये यासाठी ठेवला जातो, असं नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर म्हटलं होतं. परंतु, स्मृती मंधानाने हा निळा इमोजी आज इन्स्टाग्रामच्या बायोमधून काढून टाकला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world