सध्या सोशल मीडियावर खासकरून Instagram वर एक गाणं ट्रेंडींगमध्ये आहे. बाईलोने, बल्लिपलिके (Bayilone Ballipalike Trending Song) या गाण्याला युट्युबवर उत्तम प्रतिसाद मिळताना दिसतोय. अवघ्या महिनाभरात हे गाणे 76 लाख लोकांनी पाहिलं आहे. या गाण्यात दिसणारी महिला हीच या गाण्याची गायिका आहे हे ऐकल्यानंतर अनेकांना ते खरं वाटणार नाही. मांगली (Singer Mangli) असं या गायिकेचं नाव आहे. असं कसं नाव? असा अनेकांना प्रश्न पडू शकतो. हे नाव संस्कृत असून, याचा अर्थ शुभ, भाग्यशाली असा होतो. मात्र हे या गायिकेचं खरं नाव नाहीये. तिने हे टोपणनाव घेतलंय.
लोक गीते ते आयटम नंबर
जर तुम्ही सोशल मीडिया वापरत असाल, तर 'बाईलोने बल्लिपलिके' हे गाणे तुमच्या कानावर नक्कीच पडले असेल. या गाण्यावर लाखो लोक रिल्स बनवत आहेत. पण या गाण्यामागचा आवाज कोणाचा आहे हे अनेकांना माहिती नाहीये. या गायिकेचे नाव आहे मांगली. तिचा कडक आवाज आणि अस्सल गावरान अंदाज यामुळे ती सध्या इंटरनेट सेन्सेशन ठरली आहे. मांगली (Singer Mangli) हिचं खरं नाव सत्यवती राठोड आहे (Satyavathi Rathod) ती मूळची आंध्र प्रदेशची असून आंध्र प्रदेशातील सण-वारांच्या निमित्ताने म्हटल्या जाणाऱ्या लोकगीतांना नवा साज चढवत मांगलीने सादर करण्यास सुरूवात केली होती. तिने केलेला हा प्रयोग भन्नाट यशस्वी झाला आहे. या सगळ्या गाण्यांसाठीच्या व्हिडीओमध्येही मांगलीच दिसते. तिच्यासोबत लोक गीत गाणारे कलाकारही ठळकपणे दाखवले जातात. मांगली हिने सूत्रसंचालक म्हणून कारकिर्दीला सुरूवात केली होती. माताकारी मांगली (Maatakari Mangli) आणि तीनमार वार्थालू (Teenmaar Vaarthalu) या टीव्ही शोचे तिने सूत्रसंचालन केले होते. 'सारंगा दरिया' या फिल्मी गीतामुळे तिच्यातील गायिका जगाला कळाली. यानंतर मांगलीने लोक गीतांसोबतच तेलुगु, हिंदी, कन्नड भाषेतील चित्रपटांमधील गाण्यांना आवाज देण्यास सुरूवात केली. तिने गायलेली दोन आयटम नंबर गाणी हे संपूर्ण भारतात गाजली आहेत.
मेस्सीच्या दौरा मांगलीने गाजवला (Lionel Messi India Tour)
फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी (Lionel Messi)हा नुकताच भारत दौऱ्यावर आला होता. त्याच्या हैदराबाद दौऱ्याच्या निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमात मांगलीला बोलावण्यात आलं होतं. यावेळी मांगलीने सादर केलेल्या गाण्यांवर संपूर्ण स्टेडियम नाचताना दिसलं होतं.
पुष्पा आणि जवान चित्रपटासाठी गायली गाणी
पुष्पा चित्रपटातील ऊ अंटावा (Oo Antava Song) आणि जवान चित्रपटातील जिंदा बंदा (Zinda Banda Song) ही गाणी मांगलीने गायली असून ती संपूर्ण भारतात गाजली आहेत. मांगलीने संगीत अनिरूद्ध रविचंदर, गोपी सुंदर, हिप हॉप तमिळ, देवी श्री प्रसाद यासारख्या संगीतकारांसोबत काम केलं आहे. काही दिवसांपूर्वी मांगली एका वादात सापडली होती. तिच्याविरोधात सायबराबाद पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. मांगलीने एक पार्टी आयोजित केली होती. परवानगीशिवाय पार्टी आयोजित केल्याप्रकरणी तिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाढदिवानिमित्ताने तिने ही पार्टी आयोजित केली होती. तिच्या पार्टीमध्ये आलेल्या काहीजणांनी ड्रग्ज घेतल्याच वैद्यकीय तपासणीतून उघड झालं आहे. पोलिसांनी छापेमारी केली होती, त्यावेळी त्यांना अंमली पदार्थही सापडले होते. यामुळे मांगली अडचणीत आली होती. या पार्टीला किमा 25 जण होते आणि त्यातील बहुतांश लोकं हे ित्रपटसृष्टीशी िगडीत होते.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world