
Who is Ranya Rao : कन्नड चित्रपट अभिनेत्री रान्या राव (Ranya Rao) हिला सोन्याच्या तस्करी प्रकरणात मोठा धक्का बसला आहे. या प्रकरणी तिला एक वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. विशेष म्हणजे, ही शिक्षा फॉरेन एक्स्चेंज कंझर्व्हेशन अँड प्रिव्हेन्शन ऑफ स्मगलिंग ॲक्ट अंतर्गत झाली असून, या कायद्यानुसार तिला या कालावधीत जामीन मिळणार नाही.
रान्या रावला मार्च 2025 मध्ये बेंगळुरूच्या केंपेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक करण्यात आले होते. ती दुबईहून परतत असताना, 'ग्रीन चॅनेल'मधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होती. तिच्या जॅकेटमधून तब्बल 14.2 किलोग्राम सोने जप्त करण्यात आले असून, त्याची अंदाजित किंमत 12.56 कोटी रुपये आहे. या घटनेने चित्रपटसृष्टीसह सर्वत्र खळबळ उडाली आहे.
(नक्की वाचा- Zareen Khan : 'प्रत्येक सीननंतर किस... फसवणूक करत केलं शूटिंग' अभिनेत्रीनं सांगितलं धक्कादायक वास्तव)
कोण आहे रान्या राव?
रान्या राव कर्नाटकचे वरिष्ठ आयपीएस अधिकारी के. रामचंद्र राव यांची सावत्र मुलगी आहे. रान्याने सुरुवातीला बेंगळुरूमधील दयानंद सागर कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये शिक्षण घेतले. परंतु अभिनयाच्या आवडीमुळे तिने शिक्षण सोडून मुंबईतील किशोर नामित कपूर ॲक्टिंग स्कूलमध्ये अभिनयाचे प्रशिक्षण घेतले.
( नक्की वाचा : Shweta Tiwari: श्वेता तिवारीच्या माजी नवऱ्याचा 18 वर्षांनंतर मोठा गौप्यस्फोट, म्हणाला, 'ती त्याच्याबरोबर कारमध्ये येत होती' )
रान्याने तिच्या करिअरची सुरुवात मॉडेलिंगमधून. तिने अनेक जाहिरातींमध्ये काम केले. त्यानंतर तिने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. 2014 साली आलेल्या 'मणिक्या' (Manikya) या कन्नड चित्रपटातून तिने अभिनयात पाऊल ठेवले. सुपरस्टार किच्चा सुदीपसोबत तिनं या चित्रपटात काम केलं आहे. त्याचबरोबर रान्याने वगल आणि पटकी या चित्रपटांमध्येही काम केलं आहे. तिची चित्रपट कारकिर्द फारशी बहरली नाही. 2017 साली तिचा शेवटचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. मात्र ती दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीत एक ओळखीचा चेहरा बनली होती.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world