जाहिरात

Ranya Rao : वडील IPS, स्वत: अभिनेत्री, विमानतळावर 14 किलो सोन्यासह अटक, वाचा कोण आहे रान्या राव?

Ranya Rao : रान्या एमिराट्सच्या विमानानं दुबईहून बेंगळुरुला परतली होती. तिच्याबाबत यापूर्वीच सूचना मिळाली होती. त्यामुळे तिच्या विदेश प्रवासावर तपास अधिकाऱ्यांचं लक्ष होतं.

Ranya Rao : वडील IPS, स्वत: अभिनेत्री, विमानतळावर 14 किलो सोन्यासह अटक, वाचा कोण आहे रान्या राव?
मुंबई:

Ranya Rao : बेंगळुरु विमानतळावर सोने तस्करीच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. डायरेक्टोरेट ऑफ़ रेवेन्यू इंटेलिजेंस (DRI) ने विमानतळावर 14 किलो विदेशी सोन्यासह 4.73 कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे. या प्रकरणात IPS रामचंद्र राव यांची सावत्र मुलगी रान्या रावला अटक करण्यात आली आहे. रान्या प्रसिद्ध कन्नड अभिनेत्री आहे. सध्या या प्रकरणाची पूर्ण चौकशी सुरु आहे. रान्याची देखील चौकशी करण्यात येणार आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

या प्रकरणात मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी डायरेक्टोरेट ऑफ रेवेन्यू इंटेलिजेंसने सोन्याच्या तस्करांच्या विरोधात मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात केंपेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका प्रवाशाला अटक करण्यात आली. त्याच्याकडून 14.2 किलो विदी सोनं जप्त करण्यात आलं. जप्त करण्यात आलेल्या सोन्याची किंमत 12.56 कोटी रुपये आहे. 

कोण आहे रान्या राव?

रान्या रावला 3 मार्च रोजी रात्री अटक करण्यात आली. त्यानंतर तिला आर्थिक गुन्हे न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी तिला 14 मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे. रान्या राव ही डायरेक्टर ऑफ जनरल पोलीस (हाऊसिंग) रामचंद्र राव यांची सावत्र मुलगी आहे. 

याबाबत तपास अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रान्या एमिराट्सच्या विमानानं दुबईहून बेंगळुरुला परतली होती. तिच्याबाबत यापूर्वीच सूचना मिळाली होती. त्यामुळे तिच्या विदेश प्रवासावर तपास अधिकाऱ्यांचं लक्ष होतं. ती बेंगळुरु विमानतळावरुन बाहेर पडण्यापूर्वी तिला ताब्यात घेण्यात आले. त्यावेळी तिनं कथितपणे तिच्या कपड्यात सोनं लपवलं होतं, अशी माहिती आहे.

Himani Narwal Murder Case : हिमानी, प्रिया, मीना.. Facebook वर प्रेम, आयुष्याचा End Game!

( नक्की वाचा :  Himani Narwal Murder Case : हिमानी, प्रिया, मीना.. Facebook वर प्रेम, आयुष्याचा End Game! )

रान्यानं 2014 साली चित्रपट कारकिर्दीलसा सुरुवात केली. माणिक्या हा तिचा पहिला चित्रपट होता. सुपरस्टार किच्चा सुदीपसोबत तिनं या चित्रपटात काम केलं आहे. त्याचबरोबर रान्याने वगल आणि पटकी या चित्रपटांमध्येही काम केलं आहे. तिची चित्रपट कारकिर्द फारशी बहरली नाही. 2017 साली तिचा शेवटचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. 

रान्या आखाती देशांमध्ये अनेकदा कमी कालावधीसाठी प्रवास करत असे. ती या प्रवासामुळे DRI च्या रडारवर होती. रान्या ही वरीष्ठ IPS अधिकारी रामचंद्र राव यांची सावत्र मुलगी आहे. राव यांच्या पहिल्या पत्नीचं निधन झालं आहे. त्यानंतर त्यांनी दुसरं लग्न केलं. त्यांच्या दुसऱ्या पत्नीला पहिल्या लग्नापासून दोन मुली आहे. रान्या त्यापैकी एक आहे. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: