Sapna Choudhary Husband: सपना चौधरीचा पती कोण आहे? 4 वर्षांच्या रिलेशनशिपनंतर केले लग्न, मारहाणीसह छळाचा आरोप

Sapna Choudhary Husband: हरियाणाची डान्सिंग सेन्सेशन सपना चौधरीचा पती कोण आहे? नेमके काय आहे वाद? जाणून घ्या सविस्तर माहिती...

जाहिरात
Read Time: 2 mins
"Sapna Choudhary Husband: कोण आहे सपना चौधरीचा पती?"
Social Media
नवी दिल्ली:

Sapna Choudhary Husband: सपना चौधरीसोबत झालेल्या कौटुंबिक हिंसाचाराच्या (Domestic Violence) वृत्ताने सर्वांनाच हादरवले होते. द्वारका महिला कोर्टाने या प्रकरणाची सुनावणी करताना तिच्या पतीला सपनाची भेट घेण्यास किंवा कोणत्याही प्रकारे तिच्या आसपास राहण्यास मनाई करत कडक निर्देश दिले आहेत. आता या वादादरम्यान लोकांमध्ये ही चर्चा रंगली आहे की, सपना चौधरीचा पती नक्की आहे तरी कोण, ज्याच्यामुळे आपले वैयक्तिक आयुष्य नेहमी पडद्याआड ठेवणाऱ्या सपनाचे आयुष्य सर्वांसमोर आले आहे.

कोण आहेत सपना चौधरीचा पती? | Who Is Sapna Choudhary's Husband

सपना चौधरीला सुरुवातीपासूनच तिचे वैयक्तिक आयुष्य खासगी ठेवायला आवडत होते. ती सोशल मीडियावर सक्रिय आहे, पण त्यावर तिच्या कुटुंबाशी संबंधित फारशा पोस्ट दिसत नाहीत. सपनाने जेव्हा लग्न केले, तेव्हा ती बातमी सुद्धा गुपितच राहिली होती. हरियाणाची डान्सिंग सेन्सेशन सपनाने वर्ष 2020 मध्ये वीर (यशवीर) साहू याच्याशी लग्न केले. सपनाने बरेच दिवस तिच्या लग्नाची बातमी लपवून ठेवली होती. जेव्हा सपनाने तिच्या प्रेग्नेंसीची घोषणा केली, तेव्हा चाहत्यांना मोठा धक्का बसला. या गुड न्युजसोबतच वीरसुद्धा समोर आला आणि याचसोबत सपनाच्या लग्नाची बातमी पसरली. रिपोर्ट्सनुसार वीरच्या कुटुंबातील एका व्यक्तीच्या निधनामुळे या लग्नाची गोष्ट गुपित ठेवण्यात आली होती.

Advertisement

(नक्की वाचा : Kangana Ranaut: कंगना राणौतसाठी ही मराठमोळी अभिनेत्री शोधतेय मुलगा, लग्नाच्या प्रश्नावर सर्वात मोठा खुलासा)

वीर हा हिसारचा रहिवासी आहे. या दोघांनी जानेवारी वर्ष 2020 मध्ये लग्न केले होते. या लग्नाआधी दोघेही चार वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. प्रोफेशनबद्दल सांगायचे झाले तर, वीर हा गायक, संगीतकार (कम्पोजर), लेखक, निर्माता आणि अभिनेता आहे. त्याने खलनायक, रसूक आला जाट, यार लँडलॉर्ड आणि थड्डी-बड्डी यासारख्या सिनेमांमध्ये काम केले आहे. वर्ष 2019 मधील वीरचे 'शीबा की रानी' हे गाणेही खूप चर्चेत राहिले होते.

काय आहे कौटुंबिक हिंसेचे प्रकरण?

सपनाला दिल्लीच्या द्वारका महिला कोर्टाकडून कौटुंबिक हिंसेच्या प्रकरणात मंगळवारी (9 जून) अंतरिम दिलासा मिळाला आहे. कोर्टाने तिला महिला संरक्षण कायद्यांतर्गत सुरक्षा प्रदान करताना तिच्या पतीविरुद्ध अनेक प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. द्वारका कोर्टाने आदेश दिला आहे की, पुढील सुनावणीपर्यंत सपना चौधरीचा पती यशवीर साहू तिच्याशी कोणत्याही प्रकारे संपर्क साधू शकणार नाही. यासोबतच त्याला सपना चौधरीचे घर, कामाची जागा किंवा सिनेमा प्रीमियर यासारख्या कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात जाण्यासही बंदी घालण्यात आली आहे.

हा आदेश न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी निधी सिंह यांनी सपना चौधरीने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी केल्यानंतर दिला. सपनाला तिच्या वैवाहिक जीवनात कौटुंबिक हिंसेचा सामना करावा लागला आणि भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होण्याची भीती कायम आहे, असा आरोप याचिकेत करण्यात आला होता.