जाहिरात

Who is Tejaswini Lonari : कुमार संगकारावर क्रश, स्वामींची भक्त; सरवणकरांची सून होणारी अभिनेत्री कोण आहे? 

आजवर लग्नासाठी एकही स्थळ आलं नसल्याचं तेजस्विनी लोणारी हिने या मुलाखतीत सांगितलं.

Who is Tejaswini Lonari : कुमार संगकारावर क्रश, स्वामींची भक्त; सरवणकरांची सून होणारी अभिनेत्री कोण आहे? 

Who is Tejaswini Lonari : बिग बॉस 4 गाजवणारी, अनेक मराठी चित्रपटांमधून आपला ठसा उमटवणारी अभिनेत्री तेजस्विनी लोणारी एका राजकीय नेत्याच्या घरात सून म्हणून जाणार आहे. नुकताच तिचा साखरपुडा संपन्न झाला असून शिवसेना शिंदे गटाचे नेते माजी आमदार सदा सरवणकर यांचा थोरला मुलगा समाधान सरवणकरसोबत लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. 

कोण आहे तेजस्विनी लोणारी? 

अभिनेत्री तेजस्विनी लोणारी गेल्या 20 वर्षांपासून अभिनय क्षेत्रात आहे. तिने मकंरद अनासपुरेसोबत 'दोघात तिसरा आता सर्व विसरा' नावाचा चित्रपट केला होता. यानंतरही तिने त्यांच्यासोबत पाच चित्रपट केले. याशिवाय ती बिग बॉग 4 मध्येही सहभागी झाली होती. याशिवाय 'देवमाणूस 2', 'तुझेच मी गीत गात आहे' या मालिकांमध्ये तेजस्विनी लोणारी हिने भूमिका साकारली होती. 'चित्तोड की रानी पद्मिनी का जोहर' या हिंदी मालिकेत तिने राणी पद्मावतीची मुख्य भूमिका साकारली होती. 'शिट्टी वाजरी रे' या रिअॅलिटी शोमध्ये ती झळकली होती. 

Latest and Breaking News on NDTV

तेजस्विनी लोणारी ही मुळची पुण्याची असून फर्ग्यूसन महाविद्यालयात तिने शिक्षण घेतलं. तिचं आजोळ येवल्याचं असल्याने त्याबाबत तिचा फार जिव्हाळा आहे. नुकतच तेजस्विनीने स्वत:चं प्रॉडक्शन हाऊस लॉन्च केलं आहे. याशिवाय तिची प्राण्यांची एनजीओही आहे. प्राण्यांच्या शेल्टरमध्ये तिच्याकडे 30 कुत्रे आणि दोन बैलही आहेत. एका मुलाखतीदरम्यान तेजस्विनीने आपली आवड व्यक्त केली. मायकल जॅक्सन आणि श्रीलंकाचा क्रिकेटर कुमार संगकारा हे क्रश असल्याचं तिने या मुलाखतीत सांगितलं. 

नोकरी नको रे बाबा...

'मी नियमित बराच काळ नोकरी करू शकत नाही. मालिकेत काम करणं हेदेखील नोकरीसारखंच आहे. एका वेळेनंतर मला तेच तेच काम करणं शक्य होत नाही. मालिकेत काम करतानाही एका वेळेनंतर मी अस्वस्थ झाले होते. हे काम खूप आव्हानात्मक आहे. त्यामुळे मला मालिकांमध्ये काम करणाऱ्या सर्व कलाकारांबद्दल प्रचंड आदर आहे.' 

नक्की वाचा -  Tejaswini Lonari: 'ही' मराठी अभिनेत्री होणार सदा सरवणकरांची सून, साखरपुडा संपन्न, PHOTO

आतापर्यंत एकही लग्नाचं स्थळ आलं नाही...- तेजस्विनी लोणारी

तेजस्विनी लोणारी दिसायला अत्यंत सुंदर आहे. त्यामुळे अभिनय क्षेत्रात करिअर करण्याची तिची आधीपासून इच्छा होती. तिला आतापर्यंत किमान 50 जणांची प्रपोज केलं. मात्र लग्नासाठी आतापर्यंत कुणीच स्थळ घेऊन आलं नसल्याचं तेजस्विनीने या मुलाखतीत सांगितलं. अनुरूप या मेट्रिमोनियल साइटवर माझ्या वडिलांनी नाव नोंदवलं होतं. पण तरीही एकही स्थळ आलं नाही, असंही तेजस्विनीने यावेळी सांगितलं.  

मी प्रचंड अध्यात्मिक आहे. स्वामींवर माझा विश्वास आहे. स्वामींमुळे आयुष्यातील बऱ्याच अशक्य गोष्टी शक्य झाल्याचं तेजस्विनी सांगते. दरम्यान तेजस्विनी आता एका राजकीय कुटुंबात सून म्हणून जाणार आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते समाधान सरवणकर यांच्यासोबत तिचा साखरपुडा संपन्न झाला आहे. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com