Raper Akon Video Viral : शाहरुख खानच्या ‘रावन' चित्रपटातील ‘छम्मक छल्लो'हे गाणं आजही चाहत्यांच्या आवडत्या गाण्यांच्या यादीत आहे.हे गाणं लोकप्रिय रॅपर एकॉनने गायले आहे. सध्या एकॉन भारतात आहे आणि वेगवेगळ्या शहरांमध्ये त्याचे कॉन्सर्ट आयोजित केले गेले आहेत.अलीकडेच गायकाला बेंगळुरूमध्ये परफॉर्म करताना पाहिले गेले, जिथे त्याला चाहत्यांच्या गैरवर्तनाचा सामना करावा लागला.जाणून घ्या नेमकं काय घडलं होतं.
खरं तर सोशल मीडियावर एकॉनचा एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.हा व्हिडिओ बेंगळुरूमध्ये झालेल्या लाईव्ह शोचा आहे व्हिडिओमध्ये एकॉन स्टेजवर चाहत्यांच्या गर्दीत वेढलेला दिसतो. त्याच दरम्यान एका व्यक्तीने अचानक एकॉनची पॅन्ट ओढली. त्यानंतर गायक आपली पॅन्ट सावरताना दिसला आणि बॉडीगार्ड्स एकॉनला सांभाळताना दिसले.सोशल मीडियावर हा व्हिडिओ प्रचंड चर्चेत आहे.ज्यामुळे युजर्स संतापले आहेत आणि त्यांनी चाहत्यांना चांगलंच सुनावलं आहे.
भारतात कुठे कुठे झाले एकॉनचे कॉन्सर्ट?
एकॉनचा भारतातील पहिला कॉन्सर्ट दिल्लीमध्ये झाला होता. त्यानंतर गायकाने बेंगळुरूमध्ये परफॉर्मन्स दिला. तर त्याचा शेवटचा कॉन्सर्ट आज म्हणजेच १६ नोव्हेंबरला मुंबईत होणार आहे. यासाठी मायानगरीतील लोक आतुरतेने वाट पाहत आहेत.
नक्की वाचा >> Viral News: गर्लफ्रेंडसाठी हिंदू मुलगा मुस्लिम बनला, सुंता करून मशिदीत दररोज नमाज अदा करायचा, पण एक दिवस..
कोण आहे गायक एकॉन?
एकॉन हा एक प्रसिद्ध हॉलीवूड गायक आणि रॅपर आहे. ‘राइट नाऊ', ‘आय वाना लव्ह यू', ‘स्मॅक दॅट', ‘लोनली', ‘ब्युटीफुल' आणि ‘डोंट मॅटर' यांसारखी अनेक सुपरहिट गाणी त्याने दिली आहेत. एकॉनने बॉलिवूडमध्येही आपल्या आवाजाची जादू दाखवली आहे.2011 साली त्याने शाहरुख खान आणि करिना कपूर अभिनीत ‘रा.वन' चित्रपटातील ‘छम्मक छल्लो' हे गाणं गायले होते. हे गाणंही ब्लॉकबस्टर हिट ठरलं होतं. आजही हे गाणं प्रत्येक लग्नात आणि पार्टीत वाजवलं जातं.
नक्की वाचा >> KDMC निवडणुकीपूर्वीच धमाका! शिवसेना,मनसेचे आजी-माजी आमदार हळदी समारंभात एकत्र नाचले, व्हायरल व्हिडीओमुळे खळबळ