जाहिरात

राजू पाटील-राजेश मोरेंचा हळदी समारंभात भन्नाट डान्स! मनसे, शिवसेनेचे आजी-माजी आमदार एकत्र नाचले, Video व्हायरल

Shivsena-MNS Leaders Haldi Dance Video :  कल्याण-डोंबिवली महापालिकेची निवडणूक तोंडावर असताना युती-आघाडीची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. अशातच हळदी समारंभाचा व्हिडीओ व्हायरल झालाय.

राजू पाटील-राजेश मोरेंचा हळदी समारंभात भन्नाट डान्स! मनसे, शिवसेनेचे आजी-माजी आमदार एकत्र नाचले, Video व्हायरल
Raju Patil And Rajesh More
मुंबई:

अमजद खान, प्रतिनिधी

Shivsena-MNS Leaders Haldi Dance Video :  कल्याण-डोंबिवली महापालिकेची निवडणूक तोंडावर असताना युती-आघाडीची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. परंतु, निवडणुकीपूर्वीच कल्याण ग्रामीणमधील शिवसेना शिंदे गट आणि मनसेचे माजी आमदार हळदीच्या एका कार्यक्रमात भन्नाट नाचले आहेत. शिंदे गट आणि मनसेच्या माजी आमदारांनी एकत्रित डान्स केल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या नेत्यांचा डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. मनसे नेते आणि माजी आमदार राजू पाटील आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते राजेश मोरे या दोघांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. हळदीच्या कार्यक्रमात दोघेही एकत्र नाचत असल्याचं व्हिडीओत पाहायला मिळत आहे. त्यामुळे राजकीय गोटात खळबळ उडाली आहे. तसच राजकारणाबाबत अनेक तर्क वितर्क लढवले जात आहेत. 

कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीचं बिगुल येत्या काही दिवसांत वाजणार आहे. यासाठी सर्व पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. शिवसेना सिंदखेड आणि भाजपची युती होणार की नाही?महाविकास आघाडी कल्याण डोंबिवलीत होणार की नाही? तसच या निवडणुकीत मनसेची काय भूमिका असणार? अशा अनेक प्रश्नांबाबत नेतेमंडळीत खलबतं होत आहेत.अशातच भाजप आणि शिवसेना शिंदे गटात इनकमिंग सुरू आहे. 

इथे पाहा मनसे-शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांचा हळदीच्या डान्सचा व्हिडीओ

महायुतीतील पक्षांमध्ये इनकमिंग सुरू असल्याने याचा फटका ठाकरे बंधुंना बसणार, असंही म्हटलं जात आहे. मात्र शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये ज्याप्रकारे नगरसेवकांचे प्रवेश होत आहेत, ते पाहता पक्षामध्ये मोठी कुरघोडी होत असल्याचं चित्र समोर आलं आहे. राज्यभरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरु होणार आहे. परंतु, केडीएमसीच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

दुसरीकडे इच्छुकांची संख्या सर्व पक्षांमध्ये वाढली आहे. याचदरम्यान, मनसे नेते व माजी आमदार राजू पाटील आणि शिवसेना शिंदे राजेश मोरे या दोघांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. हळदीच्या कार्यक्रमात दोघेही एकत्र नाचत आहेत. या दोघांच्या डान्स करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. एकत्र डान्स करणारे आजी-माजी आमदार होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीत हे दोन्ही पक्ष एकत्र येणार का ?अशी देखील जोरदार चर्चा आहे.  

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com