जाहिरात

Viral News: गर्लफ्रेंडसाठी हिंदू मुलगा मुस्लिम बनला, सुंता करून मशिदीत दररोज नमाज अदा करायचा, पण एक दिवस..

प्रेमाला ना जात असते,ना धर्म आणि प्रेम जात-धर्म पाहून होत नाही.ते अचानक कोणाशीही कसेही होऊ शकते.पण उत्तर प्रदेशातील मऊ जिल्ह्यात असेच प्रेम एका तरुणाला फार महागात पडले.

Viral News: गर्लफ्रेंडसाठी हिंदू मुलगा मुस्लिम बनला, सुंता करून मशिदीत दररोज नमाज अदा करायचा, पण एक दिवस..
Hindu-Muslim Couple Love Story
मुंबई:

Shocking Love Story Viral : प्रेमाला ना जात असते,ना धर्म आणि प्रेम जात-धर्म पाहून होत नाही.ते अचानक कोणाशीही कसेही होऊ शकते.पण उत्तर प्रदेशातील मऊ जिल्ह्यात असेच प्रेम एका तरुणाला फार महागात पडले.त्या युवकाला केवळ मारहाणच झाली नाही,तर त्याचे जबरदस्ती खतना (टक्कल) करून धर्मपरिवर्तनही करण्यात आले.कसाबसा तो युवक पळून आपल्या घरी पोहोचला,पण तिथेही त्याला धमकावण्यात आले.त्यानंतर आईने न्यायालयात धाव घेतली आणि  आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

सुनैना विशालला घेऊन आसामला गेली, त्यानंतर जे घडलं..

मिळालेल्या माहितीनुसार,वर्ष 2022 मध्ये विशाल सिंग मऊ शहरातील आझमगढ मोड येथे असलेल्या एका डेंटल क्लिनिकमध्ये काम करत होता. तिथेच त्याची भेट अंबेडकर नगर जिल्ह्यातील मुरादपूर येथील रहिवासी सुनैना परवीन (22)हिच्याशी झाली.हळूहळू सुनैना आणि विशाल यांच्यात जवळीक वाढली आणि त्याचे रुपांतर प्रेमात झाले. त्यानंतर वर्ष 2022 मध्येच सुनैनाने विशालला आपल्या घरी नेले.तिथून ती त्याला आपल्या आजोबांच्या घरी,आसाममध्ये घेऊन गेली.तिथे सुनैनाचे नातेवाईक राजू शेख,समीर शेख आणि मौलाना सलमान यांनी मिळून जबरदस्ती खतना करून विशालचे धर्मपरिवर्तन केले.

नक्की वाचा >>पहिल्यांदाच मशिदीत गेल्यावर सोनाक्षी सिन्हाने व्हिडीओ केला शेअर,खुश झाल्यावर पती जहीर म्हणाला, धर्मपरिवर्तन...

न्यायालयाचे आदेशानंतर आरोपींविरोधात गुन्हा दाखल

त्यानंतर त्याचा सुनैनासोबत निकाह करून त्याला मशिदीत दररोज नमाज पढण्यासाठी भाग पाडले. या संपूर्ण घटनाक्रमाचा व्हिडिओही तयार करण्यात आला. त्यानंतर रोजच्या छळामुळे त्रस्त होऊन विशाल कसाबसा पळून आसामहून मऊला पोहोचला.मऊला पोहोचल्यावर विशालने आपल्या कुटुंबीयांना संपूर्ण कहाणी सांगितली आणि छळाचा व्हिडिओ दाखवला.दरम्यान, ५ ऑगस्टच्या संध्याकाळी सुनैनाचे नातेवाईक सुनैना आणि महिला पोलीस ठाण्याच्या पोलिसांसह विशालच्या घरी पोहोचले.पोलिसांनी बुधवारी सात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला.

नक्की वाचा >> 4 मित्रांनी ढेकर येईपर्यंत मॅगी खाल्ली,आता भांडी कोण घासणार? Google Gemini चं उत्तर ऐकून तुम्हीही लोटपोट हसाल

माध्यमांशी संवाद साधताना अपर पोलिस अधीक्षक अनूप कुमार यांनी सांगितले की,प्रकरणाचा तपास सुरु असून गुन्हा नोंदवण्यात आला आहे. नेमक्या कोणत्या परिस्थितीत युवकाला त्रास देऊन धर्मपरिवर्तन करण्यात आले, याचा तपास सुरू आहे. तपासात सर्व बाबी स्पष्ट झाल्यानंतर जो दोषी आढळेल,त्याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com