हत्या की अपघात? जुबीन गर्ग मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट, दारुच्या नशेत समुद्रात मारली उडी

Zubeen Garg Death Case Update: आसाम सरकार आणि त्यांच्या कुटुंबाने हत्येचा कट रचल्याचा दावा केला होता. परंतु सिंगापूर पोलिसांनी हे संशय फेटाळून लावले आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins
गायक जुबीन गर्गच्या मृत्यूबाबत मोठी अपडेट
Social Media

Jubin Garg Death Case :  आसाममधील प्रसिद्ध गायक जुबीन गर्ग याच्या मृत्यूबाबत सिंगापूर रुग्णालयात महत्त्वाचे खुलासे झाले आहेत. १९ सप्टेंबर २०२५ रोजी सिंगापूरच्या लाजरस आयलँडजवळ समुद्रात बुडाल्याने त्याचा मृत्यू झाला होता. सुरुवातीला त्याच्या कुटुंबातील काही लोकांनी जुबीनच्या हत्येमागे कट असल्याचा आरोप केला जात होता. मात्र आता पोलीस तपास आणि न्यायालयाच्या सुनावणीदरम्यान मोठी बाब समोर आली आहे. जुबीन याची हत्या नसून हा अपघात होता. दारुच्या नशेत ही धक्कादायक घटना घडली आहे. 

जुबीनकडून लाइफ जॅकेट घालण्यास नकार...

सिंगापूर पोलिसांनी कोरोनर कोर्टाला सांगितलं की, ५२ वर्षीय जुबीन घटनेवेळी अत्यंत नशेत होता. यॉट पार्टीदरम्यान त्याने भरपूर दारू प्यायली होती. त्याच्या रक्तातील अल्कोहोलचं प्रमाण खूप जास्त होतं. सुरुवातील समुद्रात उतरण्यापूर्वी त्याने लाइफ जॅकेट घातलं होतं. मात्र नंतर त्याने जॅकेट काढलं. त्यानंतर मात्र त्याने जॅकेट घालण्यास नकार दिला. त्यामुळे समुद्रात उतरताच तो पाण्यात बुडाला. तपास अधिकाऱ्यांनी सांगितलं की, जुबीनचा मृत्यू बुडाल्यामुळे झाला आहे. पोस्टमार्टममध्येही याची पुष्टी झाली आहे. त्याच्या शरीरावर काही ठिकाणी जखमा आढळून आल्या आहेत, मात्र या जखमा बचाव कार्य आणि सीपीआरदरम्यान झाल्या आहेत. 

पोलिसांनी सांगितलं की, तपासादरम्यान हत्येचा कट, फाऊल प्ले किंवा हत्येचे संकेत दिसलेले नाही. यॉटवर तब्बल २० जण उपस्थित होते. ज्यामध्ये जुबीनचे मित्र आणि सहकारीही होते. सर्वांनी दारु प्यायली होती. कोणावरही जुबीनला दारू पिण्यास जबरदस्ती करण्याचा किंवा पाण्यात धक्का देण्याचा आरोप नाही. 

जुबीनला उच्च रक्तदाब आणि अपस्माराचा त्रास होता. २०२४ मध्ये त्याला शेवटचा स्ट्रोक आला होता. घटनेच्या वेळी त्याने औषध घेतलं होतं की नाही हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही. ही घटना नॉर्थ इस्ट इंडिया फेस्टिव्हलच्या एक दिवस आधी घडली. जिथे तो सादरीकरण करणार होता. आसाम सरकार आणि त्यांच्या कुटुंबाने हत्येचा कट रचल्याचा दावा केला होता. परंतु सिंगापूर पोलिसांनी हे संशय फेटाळून लावले आहेत. राज्याचे कोरोनर सखोल चौकशीनंतर अंतिम अहवाल जारी करतील. 

Advertisement

(जुबीन गर्गची प्रसिद्ध गाणी - या अली - गँगस्टर, एक दिन तेरी राहो मे - नकाब, ए वतन - फिजा)