NDTV World Summit : संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचं स्थायी सदस्यत्व ते रतन टाटांचा सल्ला; इंग्लंडच्या माजी पंतप्रधानांच्या भाषणातील 10 मुद्दे

Former Prime Minister of England David Cameron : इंग्लंडचे माजी पंतप्रधान डेविड कॅमरुन यांनी संबोधित करताना आपल्या भाषणात भारताचं कौतुक केलं. सद्यस्थितीत भारत जलद गतीने पुढे जात असल्याचं ते यावेळी म्हणाले.

जाहिरात
Read Time: 4 mins
नवी दिल्ली:

NDTV च्या जागतिक परिषदेत NDTV World चॅनल लॉन्च करण्यात आलं. पंतप्रधान मोदींनी भारताचं स्वप्न, भविष्याचा प्लान आणि गेल्या दहा वर्षात केलेल्या कामगिरीचा आलेख मांडला. यावेळी इंग्लंडचे माजी पंतप्रधान डेविड कॅमरुन (Former Prime Minister of England David Cameron) यांनी संबोधित करताना आपल्या भाषणात भारताचं कौतुक केलं. सद्यस्थितीत भारत जलद गतीने पुढे जात असल्याचं त्यांनी आपल्या भाषणात म्हटलं.  

  1. इंग्लंडचे माजी पंतप्रधान डेविड कॅमरुन म्हणाले, 2005 मध्ये जेव्हा मी हुजूर पक्षाचा अध्यक्ष झालो, तेव्हा युरोपच्या बाहेर भारत हा पहिला देश होता जिथं मी दौरा केला. यानंतर 2010 मध्ये जेव्हा मी पंतप्रधान झालो तेव्हीही मी पहिल्यांदा भारताचा दौरा केला होता. मला भारताच्या क्षमतेवर आधीपासून विश्वास आहे. बदलत्या जागतिक परिस्थितीत भारताला संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेचे स्थायी सदस्यत्व मिळणेहा भारताचा हक्क आहे.

    चंद्रयान मोहिमेमुळे भारताची ताकद आणि महत्त्व जगाला कळाले. एक काळ असा आला जेव्हा जपानपेक्षा भारताची इंग्लंडमध्ये गुंतवणूक वाढली. लँड रोव्हर आणि जॅग्वार कंपनी टाटाने घेतली. मी पंतप्रधान असताना रतन टाटा यांचा सल्ला घेत होतो. त्यांच्या निधनाबद्दल मी शोक व्यक्त करतो. आमच्या सगळ्यात प्रसिद्ध कार ब्रँडचा ताबा घेणे, तो ब्रँड सुधारणे, वाढवणे ही इंग्लंडसाठी एक सूचनेची घंटा होती. यातून भारत किती वेगाने प्रगती करतोय हे दिसून येत आहे.

    सीरिया, व्हिएतनाम, इराण, इराक, अफगाणिस्तानसारख्या देशांमधून ब्रिटनमध्ये येणाऱ्या निर्वासितांच्या लोंढ्याची चिंता करण्याची गरज आहे. या समस्येवर समाधान काढले तर आपण सनदशीर मार्गाने इंग्लंडमध्ये येणाऱ्या नागरिकांना मिळणाऱ्या फायद्यांबद्दल अधिक प्रचार प्रसार करू शकू.

    पंतप्रधान मोदींनी त्यांच्या भाषणातून सांगितलं तसं देशाची अर्थव्यवस्था, पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी निश्चित ध्येयधोरणे आणि योजना असणं गरजेचं असतं. पंतप्रधान झाल्यानंतर तुमच्यावर अनेक गोष्टी आदळत असतात. तुमच्याकडे निश्चित ध्येयधोरणे नसतील तर तुम्ही विचलित होऊ शकता. पंतप्रधान मोदींचे लक्ष्य, धोरणे आणि ध्येय याच्यात सुस्पष्टता आहे. मेड इन इंडिया, ग्रीन,क्लीन इंडिया, नवीन तंत्रज्ञान याबाबतचे त्यांची धोरणे आणि लक्ष्य स्पष्ट आहे. इंग्लंडसाठीही हीच गोष्ट गरजेची आहे.

    बिशनसिंग बेदी यांना पाहत मी मोठा झालो आहे. राहुल द्रविडने शतक ठोकताना बघितलं आहे. माजी पंतप्रधान जॉन मेजर यांनी मला त्याचवेळी सांगितलं होतं की, हा क्रिकेटपटू बघ तो जबरदस्त आहे. विराट कोहली हा उत्तम नेतृत्व करतो. बेन स्टोक्स हा मैदानात आदर्श आहे. तसाच कोहलीदेखील आहे. गेल्या काही वर्षांत भारतीय वंशाचे क्रिकेटपटू संघात येताना दिसत आहे.

    2015 साली पंतप्रधान मोदींचे वेंबली मैदानात भाषण होते. तेव्हा 85 हजार लोकं जमली होती. माझं भाषण छोटं होतं. त्यावेळी मी म्हटलं होतं की हुजूर पक्षातील महिलेने इंग्लंडचे नेतृत्व केलंय, ज्यू व्यक्तीने केलंय आणि एके दिवशी इंग्लंडमधील भारतीय व्यक्तीही करेल. मला माहिती नव्हते की ते भाषण शेवटच्या रांगेत बसून ऋषी सुनक ऐकत होते. भारत आणि इंग्लंडमध्ये विशेष सहकार्य निर्माण झाले पाहिजे. भारतासोबतच्या व्यापार सहकार्यामुळे इंग्लंडला फायदा होईल. मात्र त्यासाठी थोडी राजकीय जोखीम उचलण्याची दोन्ही देशांना गरज आहे. 

    युक्रेन-रशियातील तणाव कमी करण्याची क्षमता भारतामध्ये आहे. चांगले दहशतवादी आणि वाईट दहशतवादी असं काही नसतं. दहशतवाद हा चूकच असतो. रशियाने युक्रेनवर केलेला हल्ला हा चूकच होता. कारण तो युक्रेनच्या सार्वभौमत्वावर केलेला हल्ला होता. सशक्त अर्थव्यवस्था, सुदृढ लोकशाही आणि पर्यावरणातील बदलांवर हरीत उपाय या तीन गोष्टींची सध्या गरज आहे. भारत या तीनही बाततीत उत्तम उदाहरणं आहेत. भारताच्या उदयामुळे जगाने आपला दृष्टिकोन आता बदलण्याची गरज आहे.

    भारताच्या प्रगतीचा जगाला फायदा होईल, भारताचे शतक हे संपूर्ण मानवतेच्या विजयाचे शतक ठरावे. एक युग जे सगळ्यांच्या कौशल्याच्या आधारे मार्गक्रमण करेल. एक युग जे सगळ्यांच्या नावीन्यतेने समृद्ध असेल. एक असे युग जिथे गरिबी नसेल, एक असे युग असेल जिथे सगळ्यांना पुढे जाण्याची समान संधी असेल, एक असे युग ज्यात भारताच्या प्रयत्नांमुळे जगात स्थिरता आणि शांतता नांदेल.

    भारताच्या प्रगतीचा जगाला फायदा होईल, भारताचे शतक हे संपूर्ण मानवतेच्या विजयाचे शतक ठरावे. स्थैर्य आणि शाश्वततेप्रमाणेच भारत देश उपायांवरही लक्ष्य केंद्रीत करत आहे. गेल्या दशकात भारताने अशा अनेक उपायांवर काम केले आहे जे जागतिक आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी गरजेचे आहे.

    पंतप्रधान असताना ऐश्वर्या राय यांच्याशी माझी भेट झाली होती. मला देवदास चित्रपट आवडला होता. मी शेवटचा बॉलीवूड चित्रपट हॉटेल मुंबई पाहिला होता. लॉकडाऊनमध्ये मी माशाचे कालवण कसे बनवायचे हे शिकलो. मी आता केरळी पद्धतीने उत्तम माशाचे कालवण बनवू शकतो.