31 December Online Order : कंडोम, आलू भूजिया, बर्फ अन्...; 31 डिसेंबरच्या रात्री 'या' गोष्टींची सर्वाधिक ऑनलाइन ऑर्डर

जर 10 मिनिटात सामान घरपोच देणाऱ्या कंपन्या नसत्या तर थर्टी फस्टची पार्टी कशी झाली असती?

जाहिरात
Read Time: 2 mins

जर 10 मिनिटात सामान घरपोच देणाऱ्या कंपन्या नसत्या तर थर्टी फस्टची पार्टी कशी झाली असती? 31 डिसेंबरच्या रात्री Blinkit आणि swiggy Instamart सारख्या प्लॅटफॉर्म पार्टी करणाऱ्यांसाठी वरदान ठरले. कारण ऐनवेळी कोणाकडे बर्फ संपला तर कोणाकडे चखना कमी पडला, तर कोणी अचानक पनीरची भाजी बनवण्याचा प्लान केला. मात्र ऑनलाइन विक्री करणाऱ्या प्लॅटफॉर्मनी कोणाच्या आनंदावर विरजण पडू दिलं नाही. थर्डी फस्टच्या रात्री अनेकांनी कंडोमची ऑर्डर केली होती. याशिवाय हँडकफ्स आणि ब्लाइंडफोल्डही मागवण्यात आले. काहींना तर अचानक अंडरवेअरचीही गरज पडली होती. 

नक्की वाचा - New Year 2025 Festival: नववर्षात मकरसंक्रांती, होळी, दिवाळी कधी आहे? सर्व सणांची यादी पाहा एका क्लिकवर

Blinkit चे सीईओ अलबिंदर ढींडसाने सोशल मीडियावर काही आकडेवारी शेअर केली आहे. थर्टी फस्टच्या पार्टीसाठी लोकांनी काय काय ऑर्डर केलं याची त्यांनी यादीच शेअर केली आहे. 31 डिसेंबरला रात्री 8 वाजेपर्यंत Blinkit वर 2.15 लाखांहून जास्त आलू भूजियाची पाकीटं ऑर्डर करण्यात आली. 45 हजारांहून अधिक सॉफ्ट ड्रिंक्सच्या कॅन ऑर्डर करण्यात आल्या. 6,834 पॅकेज बर्फाची ऑर्डर करण्यात आली. 

बर्फाची मोठी मागणी Swiggy Instamart वरही पाहायला मिळाली. कंपनीचे सहसंस्थापक फानी किशनचे एक्सवर सांगितलं की, रात्री 7.41 वर 119 किलो बर्फ एका मिनिटात डिलिव्हर करण्यात आले होते. Swiggy Instamart वर 853 पाकिचं चिप्स एका मिनिटात ऑर्डर झाले होते. या प्लॅटफॉर्मवर सर्वाधिक सर्च केलेल्या पाच पदार्थांमध्ये दूध, चॉकलेट, द्राक्ष, पनीर आणि चिप्स यांचा समावेश आहे. 

Advertisement

कंडोममध्ये मोठी विक्री...
31 डिसेंबरच्या दुपारपर्यंत Swiggy Instamart ने 4,779 पाकिटं कंडोम डिलिव्हर करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत Blinkit ने 1.2 लाख पाकिटं कंडोम डिलिव्हर केले. यादरम्यान अलबिंदर ढिंढसा यांना कमेंट करीत एका वापरकर्त्याने विचारलं की कोणत्या फ्लेवरचे कंडोम सर्वाधिक विकले गेले, तर त्यांनी पायचार्ट शेअर केला. नव्या वर्षात चॉकलेट कंडोमची सर्वाधिक विक्री झाली. 

Blinkit वर सर्वाधिक ऑर्डर केलेल्या वस्तू..

आलू भूजिया पाकिटं -  2,34,512 
टॉनिक वॉटर कॅन्स - 45,531
आईस क्युब पाकिटं - 6,834 
इनो - 2,434 
लिपस्टिक - 1003
लाइटर - 762

Advertisement

Blinkit ने एकाच दिवसात सर्वाधिक ऑर्डर डिलिव्हर केले. कलकत्त्यात ६४,९८८ ची सर्वात मोठी पार्टी ऑर्डर होती, त्याशिवाय हैद्राबादमध्ये एका ग्राहकाने डिलिव्हरी पार्टनरला २५०० रुपयांची टीप दिली. तर बंगळुरूमध्ये सर्वाधिक टीप देण्यात आली. बंगळुरूत एकूण १,७९,७३५ टीप देण्यात आली. 

मुंबई, बंगळुरू आणि हैदराबादमध्ये सर्वाधिक थंड पेयं मागवण्यात आली. लुधियाना, राजकोट, पाँडेचेरी आणि कानपूरमध्ये ऑर्डर सरासरीपेक्षा २-३ पट जास्त होत्या. तर कोलकातामध्ये सर्वात कमी वेळ म्हणजे 4 मिनिटांत ऑर्डर डिलिव्हर करण्यात आली.

Advertisement